Mumbai Police Dog Sqaud Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Police Dog Sqaud: मॅक्स गेला! अख्खं मुंबई पोलीस डिपार्टमेन्ट हळहळलं

Mumbai News: 1993 पासून आतापर्यंतचा एकमेव गोल्ड मेडलिस्ट मॅक्स

Shivani Tichkule

सिद्देश सावंत

Mumbai Max Dog News: १९९३ पासून ते आतापर्यंत मुंबई पोलीस दलातला एकमेव गोल्ड मेडलिस्ट सुपरडॉग आहे. मुंबई पोलिसांसाठी तो एका हिरोपेक्षा कमी नव्हता. याचं नाव मॅक्स आहे. मॅक्स आज या जगात नाही. त्याचे काल रविवार २३ जुलै २०२३ रोजी विरारमध्ये निधन झालं. त्याच्या मृत्यूने संपूर्ण मुंबई पोलीस डिपार्टमेन्ट हळहळलं आहे.

याच वर्षी एप्रिल महिन्यात मॅक्स रिटायर झाला होता. आजारपणामुळे तो रिटायर झाला होता. त्यानंतर त्याला विरारमधल्या एका कुटुंबानं दत्तक घेतलं होतं. त्याचा सांभाळ तेच करत होते. मॅक्सचं जाण पोलीस दलातील अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं आहे. (Latest Marathi News)

लॅब्रोडॉर जातीचा मॅक्स अवघ्या काही महिन्यांचाच होता जेव्हा तो मुंबईत पोलीस दलात दाखल झाला. २०१२ साली तो पोलीस दलात दाखल झाला. जवळपास दीड वर्ष त्याचं पुण्यातील (Pune) डॉग ट्रेनिंग सेंटरमध्ये रितसर ट्रेनिंग झालं. त्यानंतर २०१३ पासून ऑफिशिअली तो मुंबई पोलिसांसोबत (Mumbai Police) काम करु लागला.

पीएसआय सचिन जाधव यांच्या अंडर मॅक्सने (Dog) कमाल कामगिरी करुन दाखवली. प्रचंड एक्टीव्ह, रात्रीच्या अंधारातही गोष्टी शोधण्यास पोलिसांना मदत करणं, एक्स्प्रोझिव्ह शोधून काढणं, सेलिब्रिटींच्या सुरक्षा व्यवस्थेत चोख कामगिरी बजावणं, यासाठी त्याचं प्रचंड कौतुकही व्हायचं.

म्हैसूरमधल्या एका स्पर्धेत मॅक्सने अवघ्या १० मिनिटात एक्स्प्लोझिव्ह शोधून दाखवण्याची किमया करुन दाखवली होती. मॅक्स एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात माहीर होता. बॅग असो, जमिनीखाली असो किंवा मग माणसाच्या शरीरात. कुठूही लपवण्यात आलेलं एक्स्प्लोझिव्ह शोधण्यात मॅक्स तरबेज होता.

बॉम्ब डिटेक्शन एन्ड डिसपोजल स्क्वॉडमध्ये मॅक्सने मुंबई पोलिसांत कामगिरी केली. २०१६ साली त्याने गोल्ड मेडल जिंकलं. चपळ आणि शोधकार्यात माहीर असलेल्या हा ट्रेन्ड डॉग मुंबई पोलिस दलात अल्पावधितच सगळ्यांचा लाडका झाला होता.

मुंबई पोलीस दलात त्याचा प्रमुख्याने सांभाळ हा पीएसआय सचिन जाधव आणि कॉन्स्टेबल संदीप पाटील यांनी केला होता. मॅक्सचा मृत्यू या दोघांच्याही काळचाला चटका लावून गेलाय. २०१३ ते २०२३ असा दहा वर्षांचा काळ मॅक्सने मुंबई पोलिस दलात घालवला.

आपली कारकिर्द गाजवली. मेडल्स जिंकली. पण हेल्थ इश्युमुळे याच वर्षी एप्रिल महिन्यात त्याला मुंबई पोलीस दलातून निरोप देण्यात आला. त्यानंतर अवघ्या ३ महिन्यातच मॅक्सने जगाचा निरोप घेतला. त्याच्या जाण्याने संपूर्ण मुंबई दलाकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT