ओमिक्रॉनची धास्ती; मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता Saam Tv
मुंबई/पुणे

ओमिक्रॉनची धास्ती; मुंबईतील शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता

मुंबईमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने घेतला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईमध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा (Mumbai School) १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिका शिक्षण विभागाने (Bmc education authorities) घेतला होता. मात्र, ठाणे जिल्ह्यात (thane) ओमिक्रॉनचा रुग्ण (Omicron Patient) सापडल्यामुळे मुंबई मधील शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर (school may starts later) पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. The decision start schools Mumbai likely be delayed

हे देखील पहा-

राज्यामध्ये पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा या १ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, ओमिक्रॉनची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मुंबई महापालिका शिक्षण विभागाने मुंबई आणि परिसरामधील शाळा या १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, आता मुंबईच्या वेशीवरच ओमिक्रॉनचा १ रुग्ण सापडला असल्यामुळे शहरात लवकरच आणखी कडक निर्बंध लावण्यात येतील, यामुळे पहिली ते सातवीपर्यंच्या शाळा सुरू होणे कठीण असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

"युरोपिय देशात ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा अहवाल समोर आला आहे. शाळा सुरू झाल्यास त्याचा मोठा फटका आमच्या मुलांना बसू शकणार आहे. यामुळे आम्ही शाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी कोणतीही संमती देण्यासाठी विचार करू. शाळा सुरू केल्या तर काही झाल्यास त्याची सर्व जबाबदारी सरकारने घ्यावी."

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT