Best Bus Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: 'बेस्ट' निर्णय कंत्राटी कामगारांना मिळणार ७५०० रुपयांचा बोनस

बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे ऐन दिवाळीत आक्रमक पवित्रा घेत काल काम बंद आंदोलन केले होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे -

मुंबई : बेस्टच्या कंत्राटी कामगारांनी विविध प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यामुळे ऐन दिवाळीत आक्रमक पवित्रा घेत काल काम बंद आंदोलन केले होते. या आंदोलनात सांताक्रूझ बेस्ट बस आगारातील शेकडो बेस्ट कर्मचारी संपावर गेल्यामुळे दिवाळीत प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले होते. (Best Contract Worker)

मात्र, आता मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) लेखी आश्वासन देऊन बेस्टच्या कंत्राटी कामगारांना आजपासून सानुग्रह अनुदान देण्याचे मान्य केल्यामुळे आता हे आंदोलन मागे घेत कामावरती रुजू होण्याचा निर्णय कंत्राटी कामगारांसह मनसेने घेतला आहे.

पाहा व्हिडीओ -

याबाबत मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आलं असून सर्व महाराष्ट्र सैनिक आणि कामगारांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार, कामगार एकजुटीचा विजय झाला. बेस्टच्या कंत्राटी कामगारांना ७५०० रुपयांचा बोनस मिळणार असून त्याबाबत कंत्राटी कंपनी मातेश्वरी ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाने लेखी आश्वासन दिल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे तुर्तास तरी मुंबईकरांना बेस्टची सेवा उपलब्ध झाल्यामुळे प्रवास करण्यास अडचण येणार नाहीये.

कामगारांनी दिलेला संपाचा इशारा -

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आज सांताक्रूझ आगार (Santacruz depot), मजास आगार, प्रतीक्षा नगर आगार आणि धारावी आगारात बेस्ट कर्मचाऱ्यांनी एकत्रित संपाचा इशारा दिला होता. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची होणारी गैरसोय आणि संभाव्य धोका ओळखता आता कंत्राटदार कंपनीने कामगारांची प्रमुख आग्रही असणारी बोनसची मागणी मान्य केली आहे. याबाबतचं पत्र कंपनीने पोलिसांसह मनसेला पाठवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बीडवरून नगरला फक्त ४० रूपयात, रेल्वे कोणकोणत्या स्थानकात थांबणार? वाचा सविस्तर

Mumbai Accident: अभिनेत्री मानसी नाईकच्या EX पतीचा भीषण अपघात; Video viral

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

SCROLL FOR NEXT