shinde-Fadnavis Cabinet Expansion
shinde-Fadnavis Cabinet Expansion saam tv
मुंबई/पुणे

हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? वर्षावर रात्री उशीरा शिंदे-फडणवीसांची भेट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत, मुंबई

Maharashtra Cabinet Expansion: राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिंदे-फडणवीसांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. काल, सोमवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यात बैठक झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर दाखल झाले. या दोघांमध्ये तब्बल सव्वा तास चर्चा झाली. ही चर्चा मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्र्यांचा विस्ताराबाबत झाली असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. (Maharashtra Politics Latest News)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल, सोमवारी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर लगेचच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

तसेच राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार? होणार असल्याची माहिती आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची तारीखही निश्चित होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यमंत्रीही असणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे काही नव्या दमाच्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सव्वा तास चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली. यात जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांबाबतही चर्चा झाली असल्याची माहीती आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुढील २४ तासात उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून केली जाणार

Manoj Jarange Patil News | मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीत मराठा समाजाला काय आवाहन केलं?

Whatsapp: ‘या’ चुकांमुळे होऊ शकतं तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बॅन

Sanjay Raut News | तर अजित पवारांना दुध विकावं लागलं असतं, राऊत यांचा घणाघात

Sahil Khan Arrest : मोठी बातमी!, साहिल खानाला मुंबईत आणलं; कोर्टाकडून ४ दिवसांची पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT