Rohini Gudaghe
व्हॉट्सअॅप वापरताना थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तर कारवाई होऊ शकते.
जीबी व्हॉट्सअॅप, व्हॉट्सअॅप प्लस आणि व्हॉट्सअॅप डेल्टासारख्या अॅपवर बंदी घालण्यात आलीय.
दुसऱ्या व्यक्तीचे डीटेल्स वापरून व्हॉट्सअॅप खाते तयार केल्यास कारवाई होऊ शकते.
सतत अनोळखी व्यक्तीला मेसेज पाठवत असाल तर खाते बॅन केले जाऊ शकते.
व्हॉट्सअॅप अशा खात्यांना बनावट आणि स्पॅम संदेश पसरवणारे समजते.
कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये नसलेल्या नंबरवर वारंवार मेसेज पाठवल्यास व्हॉट्सअॅपच्या नियमांचं उल्लंघन होतं.
जर काही लोकांनी व्हॉट्सअॅप अकाउंट रिपोर्ट किंवा ब्लॉक केले असेल तर खाते बंद होऊ शकते.
व्हॉट्सअॅपद्वारे बेकायदेशीर संदेश, अश्लील किंवा धमकीचे संदेश पाठवल्यास खाते बॅन केले जाऊ शकते.