Manpada Police Station  Saamtv
मुंबई/पुणे

Thane News: पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवने बांधकाम व्यावसायिकाला पडले महागात, एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार

Making Reels in Police Station: धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुरेंद्र पाटील विरोधात आधीच सात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अभिजीत देशमुख..

Manpada News: पोलिसांच्या खुर्चीत बसून रिल्स बनवणाऱ्या एका बांधकाम व्यावसायिकाला मानपाडा पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. डोबींवलीमधील रिलस्टार सुरेंद्र पाटील याच्याविरोधात पोलिसांनी थेट तडीपारीची कारवाई केली असून, नोव्हेंबर २०२२ मध्ये मानपाडा पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला होता. (Latest Marathi Update)

याबाबत अधिक माहिती अशी की, डोंबीवलीमधील बांधकाम व्यावसायिक आणि रिल स्टार सुरेंद्र पाटील मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये गेला होता. त्यावेळी त्याने थेट पोलिसांच्या खुर्चीवर बसत एक रिल शूट केले होते. इतकेच नव्हेतर ते सोशल मीडियावर पोस्टही केले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करत पोलिस कारवाईची मागणी केली होती.

नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या या प्रकारावर पोलिसांनी कडक कारवाई करत एक वर्षासाठी ठाणे जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सुरेंद्र पाटीलविरोधात आधीच सात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. या सगळ्या गुन्ह्यांवरुन त्याच्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याबद्दलची माहिती एसीपी सुनील कुराडे यांनी दिली आहे.. (Thane News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

SCROLL FOR NEXT