कर्करोगाशी झुंजणाऱ्या नागरिकाला बिल्डरचा 41 लाखांचा गंडा; फ्लॅट देतो म्हणून... Saam TV
मुंबई/पुणे

कर्करोगाशी झुंजणाऱ्या नागरिकाला बिल्डरचा 41 लाखांचा गंडा; फ्लॅट देतो म्हणून...

दिलीप कांबळे

पुणे: मावळ मधील तळेगाव येथील एका कर्करोगाने पीडित असलेल्या रुग्णाला मुंबईतील बिल्डरने 41 लाख रुपये घेऊन फ्लॅट दिला नाही. औषध उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी थेट मुंबईत जाऊन महासंचालकांची भेट घेतली. त्या बिल्डरवर पंधरा दिवसात जर कारवाई केली नाही तर मंत्रालया पुढे कुटुंबासहित आत्महत्या करू असा इशारा दिला आहे. अरुण गडदे यांनी नऊ वर्षांपूर्वी मुंबई येथील मंगलमूर्ती इंटरप्राईजेस चे मालक प्रकाश लामगे यांच्याशी फ्लॅट खरेदीबाबत रीतसर आर्थिक व्यवहार झाला होता. मात्र अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा मिळालेला नाही. मुंबईत खेतवाडी गिरगाव डिव्हिजन येथील प्लॉट क्रमांक 826 येथील अरब बिल्डिंगमध्ये चारशे चौरसफूट क्षेत्रफळाचा फ्लॅट खरेदी केला आणि चाळीस लाख रुपयांचा व्यवहार करून तसा नोंदणीकृत करार केला. ठरल्याप्रमाणे गडदे यांनी सर्व रक्कम चेक द्वारे बिल्डरला दिली. मात्र अजूनही प्रकाश लामगे यांनी अरुण गडदे यांना फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. दरम्यान या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या क्रॉफर्ड मार्केट येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाकडे प्रकाश लामगे यांच्या विरुद्ध पाच जुलै 2016 ल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बांधकाम सुरु करण्याची परवानगी मिळाल्यानंतर तीस महिन्यांच्या आत तयार झालेल्या फ्लॅटचा शांततामय मार्गाने ताबा देण्याचे लामगे यांनी मान्य केले. परंतु लामगे यांनी करारनाम्याचे पालन करण्यात अयशस्वी झाले तर पंधरा दिवसांची नोटीस देऊ म्हणून घेतलेली रक्कम बारा टक्के वार्षिक व्याजाने खरेदीदाराला परत करेल, असे करारनाम्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र या करारनाम्यात अटी आणि शर्तींचे पालन बिल्डरने केले नाही. त्यामुळे त्यांच्यावर गडगे यांनी गुन्हा दाखल केला. या घटनेस नऊ वर्षे होऊन गेली मात्र अद्यापही गडगे यांना त्यांची रक्कम व्याजासह मिळलेली नाही, मध्यंतरी त्यांना कर्करोगाचे ग्रासले. तेव्हापासून त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरु आहेत. सद्यस्थितीत ते तळेगाव दाभाडे येथील आपल्या भाच्या कडे राहत आहे. कर्करोगावरील उपचारांमुळे त्यांना प्रवास करणेही शक्य नाही. महिन्यां काठी त्यांच्या औषध उपचार करीता चाळीस हजार रुपये खर्च येतो.

दोन वर्षा पासून अरुण मामा माझ्या कडेच राहतात. त्यांच्या औषधाला महिन्या काठी चाळीस हजार रुपये खर्च येतो. दोन वर्ष झाली कोरोना मुळे रिक्षाला धंदा नाही. आमच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षांवर आहे. मी आणि माझी दोन मुले कसातरी जीवन काढत आहे. त्यात मामाचे आजारपण आले कुठून पैसा आणू त्यामुळे मामाने जो फ्लॅट मुंबई मध्ये घेतला होतं तो फ्लॅट ही मिळत नाही आणि 41 लाख ही मिळत नाही. त्यामुळे सर्व कुटुंब आम्ही आत्महत्या करणार आहे. फसवणुकीचे प्रकार हे आता सर्रास पहायला मिळत आहे. परंतु परिस्थिती पुढे हतबल झालेल्या गडदे कुटुंबीयांनी आता थेट आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन कधी कारवाई करणार हेच पहाणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

Maharashtra Assembly Election : नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का, गिरीश महाजन यांचा विश्वासू नेता तुतारीच्या वाटेवर

Rishabh Pant: शस्त्रक्रिया झालेल्या गुडघ्यालाच दुखापत, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकणार पंत? BCCI ने दिली महत्त्वाची अपडेट

Assembly Election 2024: '५१, ००० रुपये द्या अन् आमदारकीचे तिकीट घ्या...', पक्षाने ठेवली अजब अट; इच्छुकांची कोंडी

SCROLL FOR NEXT