व्यापाऱ्याला लोखंडी रॅाडने मारहाण करणारा एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात Saam Tv
मुंबई/पुणे

व्यापाऱ्याला लोखंडी रॅाडने मारहाण करणारा एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात

उल्हासनगर एका शुजचे दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काल रात्री घडला होता.

अजय दुधाने

उल्हासनगर एका शुजचे दुकानात काम करणाऱ्या कामगाराला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार काल रात्री घडला होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत काही तासातच एका आरोपीला अटक केली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प १ भागात राहुल शूज नावाचं दुकान आहे. या दुकानाचे मालक सुरेश छाब्रिया आणि मुख्य आरोपी अशोक वानखेडे यांचे ३ दिवसांपूर्वी वाद झाले होते.

या वादात वानखेडे याला मारहाण झाली होती. त्यामुळे वानखेडे याने त्याच्या अन्य काही साथीदारांना सोबत घेत काल राहुल शूज दुकानाबाहेर येऊन दुकानातील कामगार दीपक छाब्रिया याला लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. दुकानाचे मालक आणि अन्य कामगार त्याला सोडवायला मध्ये गेले असता त्यांनाही किरकोळ मारहाण करण्यात आली.

या मारहाणीत दीपक छाब्रिया याचा एक पाय फ्रॅक्चर झाला आहे. मारहाणीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा भादंवि ३२६ नुसार गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली आणि काही तासातच अक्षय पिल्ले या एका आरोपीला बेड्या ठोकल्या. तर मुख्य आरोपी अशोक वानखेडे आणि अन्य २ असे तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, अशी माहिती उल्हासनगरचे साहाय्यक पोलीस आयुक्त धुळा टेळे यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirdi to Tirupati : शिर्डीवरून तिरुपतीला झटक्यात पोहचा, तब्बल १८ एक्सप्रेस धावणार, कोणकोणत्या स्थानकात थांबणार ट्रेन?

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

Ladki Bahin Yojana: लाडकीला जुलै महिन्याचे ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर, आजच नोट करा

Raksha Bandhan: रक्षाबंधनपासून 3 राशींची होणार चांदीच चांदी; शनी-मंगळ बनवणार पॉवरफुल योग

SCROLL FOR NEXT