नयानगर पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला 8 बंदुका, 8 मॅगझीन आणि 14 काडतुसांसह अटक चेतन इंगळे
मुंबई/पुणे

नयानगर पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला 8 बंदुका, 8 मॅगझीन आणि 14 काडतुसांसह अटक

आरोपी विरोधात आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी मध्य प्रदेशातून आरोपीला 8 बंदुका, 8 मॅगझीन आणि 14 काडतुसांसह अटक केली आहे. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मीरा रोडच्या नयानगर पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट येथील 48 वर्षीय व्यक्तीला नया नगर परिसरातून 5 पिस्तूल, 5 मॅगझिन आणि 8 जिवंत काडतुसेसह अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो एकटाच मध्य प्रदेशातून मीरा रोड व आसपासच्या परिसरात शस्त्रे आणून विकत असल्याचे निष्पन्न झाले.

हे देखील पहा -

अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता, आरोपींनी मध्य प्रदेशातील ढाब्याच्या मागे असलेल्या पाण्याच्या टाकीत आणखी बंदुका आणि काडतुसे ठेवल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर नया नगर पोलिसांचे पथक मध्य प्रदेशात गेले. आणि आरोपीचा माग काढला. मात्र त्याच्या घरातून आणखी 4 बंदुका, 4 मॅगझिन आणि 6 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.नयानगर पोलिसांनी आरोपीकडून एकूण 8 बंदुका, 8 मॅगझीन, आणि 14 जिवंत काडतुसे जप्त केली असून त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rava Ladoo: घरच्या घरी अशा पद्धतीने बनवा रव्याचा लाडू; तोंडात टाकताच विरघळेल

Pune News: धावत्या बससमोर उडी मारून एकाची आत्महत्या, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू; पुण्यात खळबळ

Maharashtra News Live Update: नीट पेपर फूट प्रकरण, १६ संशयित आरोपी तपास यंत्रणांच्या ताब्यात

PM मोदी म्हणाले पेट्रोल-डिझेलची बचत करा; पण देशात किती दिवस पुरेल इतका साठा? सरकारची अधिकृत आकडेवारी

आधी बायकोच्या बॉयफ्रेंडची हत्या केली, नंतर प्रायव्हेट पार्ट जाळला; विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्याचं हादरवणारं कृत्य

SCROLL FOR NEXT