Jitendra Avhad Saam TV
मुंबई/पुणे

'आव्हाडांचे 'ते' वक्तव्य म्हणजे महाराष्ट्र द्रोह; आदित्य ठाकरेंनी उत्तर द्यावं'

'मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल तर हा महाराष्ट्र द्रोह नव्हे का?'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : काल मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवरती (Sridhar Patankar) झालेल्या कारवाईबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावरती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं होत. ते म्हणाले, मला राजकारणात 38 वर्षे झाली, माझ्या पोरीचा काय राजकारणाशी संबंध आहे. मात्र, आज ती किती ठिकाणी डायरेक्टर आहे. जर नुसतं बोलवलं तर ती आत्महत्या करेल,” असं वक्तव्य केलं आव्हाड यांनी केलं होतं तसंच मी माझ्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले होते. पत्रकारांनी “तुमची मुलगी या देशात राहणार नाही की काय?,” असा प्रश्न विचारला असता आव्हाड यांनी नकारार्थी मान डोलवली होती.

आव्हाडांच्या याच वक्तव्यावरुन भाजपनेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आव्हाडांवर निशाना साधला आहे ते म्हणाले, मंत्री पदावर बसलेली व्यक्ती महाराष्ट्राबद्दल असं गंभीर वक्तव्य करत असेल जगभरात आणि देशभरात महाराष्ट्र हे बिकट परिस्थितीत चाललेलं राज्य आहे असा प्रचार करत आहेत हा महाराष्ट्र द्रोह आहे, याच उत्तर आदित्य ठाकरेंनी (Aditya Thckeray) द्यावं असही शेलार म्हणाले.

दरम्यान, मुंबई पोलिस दलातील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांना निलंबित केल असून आंगडियांवर दबाव टाकत कोट्यवधी रूपयांची ते वसूली करत होते. केंद्रीय यंत्रणांना बदनाम करण्याच काम महाराष्ट्र सरकार करत आहे. असे अजुन किती सौरभ त्रिपाठी (Saurabh Tripathi) पोलिस दलात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित करत अशी बिकट अवस्था महाराष्ट्राची कधीच नव्हती. गृहमंत्र्यांनी याची दखल घेऊन याबाबत सविस्तर चौकशी करण्याच आश्वासन असल्याचंही शेलार यांनी सांगितलं.

Edite By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

OBC/ Maratha Reservation: मुख्यमंत्री फडणवीसांसमोर आखणी एक आव्हान; उपराजधानीत निघणार भव्य मोर्चा

SCROLL FOR NEXT