Thane water cut Saam tv
मुंबई/पुणे

Thane water cut : ठाणेकरांनो लक्ष द्या! शहरातील या भागात २ दिवस पाणीपुरवठा राहणार बंद, वाचा सविस्तर

Thane water cut update : ठाण्यात दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Vishal Gangurde

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी २ मे आणि शनिवारी ३ मे रोजी बंद राहणार आहे. २ मे रोजी सकाळी ९ ते ३ मे रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या निर्णयाचा फटका शहरातील काही भागांना बसणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना जपून पाणी वापरावे लागणार आहे.

२४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता...

ठाणे महापालिका स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करणार आहे. त्यामुळे पालिकेच्या निर्णयाचा फटका शहरातील काही भागांना बसणार आहे. ठाणे शहरात २४ तास पाणीपुरवठा बंद न ठेवता टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरु ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २ मे रोजी ९ वाजता ते रात्री ९ वाजेपर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, बाळकूम, ब्रम्हांड, पवार नगर, कोठारी कम्पाऊंड, डोंगरीपाडा, वाघबीळ या भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी २ मे रोजी ९ पासून शनिवारी ३ मे रोजी सकाळी ९ वाजेपरपर्यंत समता नगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इंटरनिटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा आणि मुंब्रा येथील काभी भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मांजरा धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने घट

लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा मध्यम प्रकल्पातील पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होत आहे. मांजरा धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले आहे. धरणातून दररोज साधारणता 1 दलघमी पाणीसाठा कमी होत आहे. सध्या प्रकल्पात केवळ 28 टक्के इतकाच जिवंत पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मांजरा धरणावर बीड जिल्ह्यातील आणि धाराशिव, लातूर जिल्ह्यातील अनेक गाव अवलंबून आहेत.

वाशिम जिल्ह्यातील ७७ लघु सिंचन प्रकल्पानी गाठला तळ

वाशिम जिल्ह्यातील जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या ७७ लघु सिंचन प्रकल्पांनी यंदा एप्रिल महिन्याच्या शेवटीच तळ गाठला आहे. वाशिम जिल्ह्यातील ७७ प्रकल्पात केवळ १८ टक्के जलसाठा शिल्लक राहिलाय. त्यामुळे दुष्काळाच्या झळा तीव्र होण्याची शक्यता निर्माण झालीये. जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा गंभीर झालाय. हे प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकात गुरे सोडले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT