Manasvi Choudhary
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवी आहे.
तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे.
याच शक्तीपीठाचे एक रूप ठाण्यात साकारलं आहे.
काळ्या पाषाणातून म्हणजेच कृष्णशिळेतून हे मंदिर साकारण्यात आलं आहे.
ठाण्यातील पांचपाखाडी येथे तुळजाभवानी मंदिर आहे.
१ हजार ३५० टन काळे पाषाण, ३३ फुटांचा कलश अन् त्यासमोर नवग्रह, प्रवेश कळश, २६ स्तंभ, २० गजमुखांची आरास, मंदिरासमोर हवनकुंड, १०८ दिव्यांची दीपमाळ या सर्वांनी सुसज्ज असं हे मंदिर साकारलं आहे.
विविध ठिकाणांहून भाविक देवीच्या दर्शनासाठी या ठिकाणी येतात.