Manasvi Choudhary
आज अक्षय्य तृतीयेचा सण सर्वत्र साजरा होत आहे.
अक्षय्य तृतीयेला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची खास पूजा करून गोड पदार्थाचे नैवेद्य दाखवतात.
आज आम्ही तुम्हाला केशर आम्रखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.
केशर आम्रखंड बनवण्यासाठी दही, वेलची पावडर, जायफळ पावडर, केशर, पिठी साखर, आंब्याचा रस, बदाम, काजू हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम घट्ट दहीमध्ये वेलची, जायफळ आणि केशर मिक्स करून घ्या.
नंतर केशर दुधामध्ये भिजत घालून ठेवा म्हणजेच केशरचा रंग दुधात मिक्स होईल.
आता दहीमध्ये पिठीसाखर घालून २-३ मिनिटे चांगले फेटून घ्या. यामुळे दही मऊ होईल.
नंतर या मिश्रणात साखर आणि ड्रायफ्रुट्स घाला.
अशाप्रकारे केशर आम्रखंड काहीवेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि सर्व्ह करा.