thane water supply  Saam tv
मुंबई/पुणे

ठाणेकरांवर पाणीसंकट ? अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद

Thane Water Supply : ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी. ठाण्यातील अनेक भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

विकास काटे, ठाणे

ठाणेकरांवर पाणी जपून वापरावे लागणार

ठाण्यातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

शहरात पाणीटंचाई होऊन नये म्हणून पालिकेने घेतला निर्णय

ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्यातील काही भागात २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे पावसाळाच्या तोंडावर ठाणेकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे महानगरपालिकेत मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. अलनिनो आणि आयओडीच्या प्रभावामुळे समुद्र प्रवाह सक्रिय झाल्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबाबत ठाणे महापालिकेची जलसंपदा विभागाबरोबर १४ मे रोजी बैठक झाली. या बैठकीतील निर्णयानुसार आगामी पाणीटंचाईची परिस्थ‍िती उद्भवू नये म्हणून पाणीकपात करण्याचे ठरवलं.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा गुरूवार ४ जून रोजी दुपारी 12.00 वाजल्यापासून ते शुक्रवार ५ जून रोजी दुपारी 12.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती हाती आली आहे.

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये आणि वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर, मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालचा गावात पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणेकरांनी पाणीकपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे, असं आवाहन पालिकेने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT