ठाणे–भिवंडी दरम्यान प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून ५-७ मिनिटांवर येणार.
२.२ किमी लांबीचा ६ पदरी पूल बांधला जाणार आहे.
प्रकल्पाचा अंदाजे खर्च ₹४३० कोटी इतका आहे.
पुढील ३-४ वर्षांत पूल तयार होणार आहे.
Thane to Bhiwandi travel time reduced to 7 minutes : भिवंडी आणि ठाणे या दोन शहरादरम्यान प्रवास करताना गर्दीमुळे अर्धा ते पाऊण तासांचा वेळ लागतो. वाहतूककोंडी जास्त असेल तर हा वेळ आणखी वाढतो. पण एमएमआरडीएकडून ठाणेकरांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलला आहे. वाहतूककोंडीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सहा पदरी ब्रिज बांधण्याचा प्लॅन आखला आहे. वसई खाडीवरून सहा पदरी उड्डाणपूल बांधून ठाणे आणि भिवंडीला जोडण्याची योजना एमएमआरडीने तयार केली आहे. हा ब्रिज तयार झाल्यास ठाणे आणि भिवंडी या दोन शहरातील अंतर फक्त सात मिनिटांवर येणार आहे.
ठाणे आणि भिवंडी या दोन शहरांमधील १०-१२ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सध्या कमीत कमी अर्धातास ते ४५ मिनिटे वेळ लागतोच. बालकुम नाका आणि कासेली ब्रिजमार्गे वळणाऱ्या वळणदार रस्त्यांमुळे ट्रॅफिक जॅम, जड वाहतुकीचा ताण यावेळी विनाकारण वेळ जातो. कोल्शेत-कल्हेर क्रीक ब्रिजच्या बांधकामाने हा प्रवास केवळ ५ ते ७ मिनिटांत पूर्ण होणार आहे. २.२ किलोमीटर लांबीचा सहा-रस्त्यांची (सिक्स-लेन) भव्य पूल वसई खाडीवर बांधला जाणार आहे. यामुळे ठाण्याच्या कोल्शेत भागाला भिवंडीच्या कल्हेर भागाशी थेट जोडले जाणार आहे.
२.२ किलोमीटर लांबीचा पूल ठाण्यातील कोळशेत येथून सुरू होणार असून भिवंडीतील काल्हेरमध्ये संपणार आहे. वसई खाडीवर उभारला जाणाऱ्या या पूलाचा अंदाजे खर्च ४३० कोटी इतका असल्याचे समजतेय. हा पूल ६ पदरी तयार करण्यात येणार आहे. या पूलामुळे ४५ मिनिटांचा प्रवास सहा ते सात मिनिटांत पूर्ण होणार आहे. पुढील तीन ते चार वर्षांत हा पूल तयार करण्याचा प्लॅन एमएमआरडीएने आखला आहे. या ब्रिजसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच कामालाही सुरूवात होऊ शकते.
या ब्रिजमुळे लोकांचा वेळ वाचणार आहे. दररोजच्या प्रवासात नागरिकांचा ३८-४० मिनिटांचा प्रवास वाचणार आहे. ऑफिसमधील कर्मचारी, विद्यार्थी आणि व्यवसायिकांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचणार आहे. भिवंडी हे लॉजिस्टिक्स आणि पॉवरलूम उद्योगांचे प्रमुख केंद्र मानले जाते. येथून मुंबई-ठाण्याकडे जाणाऱ्या ट्रक आणि मालवाहतुकीमुळे सध्या रस्ते नेहमीच गर्दीने भरलेले असतात. नवीन पुलामुळे ही वाहतूक विभागली जाईल. त्यामुळे वाहतूककोंडीची कटकट कमी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.