Thane Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: बापाकडून सावत्र मुलीवर ५ वेळा बलात्कार, सहाव्यांदा जबरदस्ती करायला गेला अन्...

Thane Crime: ठाण्यामध्ये १६ वर्षीय मुलीवर सावत्र बापाने वारंवार बलात्कार केला. पीडितेने आईला सांगितले तेव्हा तिने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Priya More

Summary -

  • ठाण्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण

  • आरोपी बापालाने आरोप खोटे असल्याचे कोर्टाला सांगितले

  • कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला जामीन दिला

  • पण मुंबई हायकोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळून अटक करण्याचे आदेश दिले

ठाण्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या १६ वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला ठाण्यातील कनिष्ठ न्यायालयाने जामीन दिला होता. हा जामीन मुंबई हायकोर्टाने रद्द करत आरोपीला पुन्हा अटक करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी हायकोर्टाने हे स्पष्ट केले की, अल्पवयीन मुलीवरील लैंगिक शोषणाचे आरोप फक्त वैवाहिक कलहाचा गुन्हा मानता येणार नाही.

४७ वर्षीय आरोपीने आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने २०१४ मध्ये आरोपीशी लग्न केले होते. आरोपने एप्रिल २०२३ ते २०२५ या कालावधीमध्ये ५ वेळा मुलीवर बलात्कार केला. आरोपीने धमकावल्यामुळे पीडित मुलीने ही बाब कुणालाच सांगितली नाही. पण एप्रिल २०२५ मध्ये आरोपीने सहाव्यांदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. तेव्हा पीडितीने त्याला विरोध केला आणि आपल्या आईला याची माहिती दिली. आरोपीचे कृत्य ऐकून पीडित मुलीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली.

पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. तिने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. पण आरोपीने ठाणे कनिष्ठ न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्याने जामीन अर्जात पत्नीने माझ्यावर खोटे आरोप केल्याचा दावा केला. त्यामुळे आरोपीला जून २०२५ मध्ये जामीन मिळाला. पण नंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने हायकोर्टात धाव घेत आरोपीचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी केली.

कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला जून २०२५ मध्ये जामीन दिला होता. मुंबई हायकोर्टाने हा दावा फेटाळून लावत म्हटले की, मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये भीती आणि दबावामुळे पीडितांना अनेकदा त्वरित माहिती उघड करावी लागते. या प्रकरणात पीडितेने वारंवार होणारे अत्याचार शांतपणे सहन केले आणि परिस्थिती असह्य झाल्यावरच तिच्या आईला सांगितले. इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला जामीन दिल्याने खटला आणि साक्षी प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो, असे हायकोर्टाने सांगितले.

हायकोर्टाच्या न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालयाने फक्त नवरा-बायकोच्या मतभेदांमुळे आरोप खोटे असल्याचा युक्तिवाद विचारात घेतला. तर एफआयआरच्या पुनरावलोकनातून हे प्रकरण गंभीर आणि संवेदनशील असल्याचे दिसून येते. जर एखाद्या महिलेला तिचा नवरा तिच्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचे कळाले तर त्याच्यापासून दूर राहणे ही पूर्णपणे नैसर्गिक आणि मानवी प्रतिक्रिया आहे. याला सामान्य वैवाहिक वाद म्हणून पाहिले जाऊ शकत नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT