Thane Crime  Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Crime: मालमत्तेचा वाद टोकाला गेला, सावत्र भावाचं शीर धडावेगळं केलं अन् जंगलात गाडलं; ठाणे हादरलं

Man Kills Stepbrother: ठाण्यात संपत्तीच्या वादातून सावत्र भावाने भावाची निर्घृण हत्या केली. फैजल गौरीच्या मृतदेहाचा तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, परिसरात खळबळ उडाली आहे.

Bhagyashree Kamble

राज्यात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संपत्तीच्या वादातून सावत्र भावाने आपल्या भावाची निर्घृण हत्या केली असून, काही दिवसांपूर्वी जंगलात शीर नसलेला अज्ञात मृतदेह सापडल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेने संपूर्ण ठाणे परिसरात खळबळ उडाली आहे.

फैजल मोहम्मद गौरी (वय वर्ष २९) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, अन्सारी असं आरोपीचे नाव आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, २९ मे रोजी गावातील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात बेपत्ता व्यक्तीबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. सीसीटीव्ही आणि बेपत्ता व्यक्तीचे फोटो जुळल्यामुळे हे प्रकरण हळूहळू उघडकीस येत होतं.

तपास पथकाने घटनास्थळावरील एका अज्ञात व्यक्तीची कार ओळखली, त्यानंतर आरोपीचा तपास करून त्याला अटक केली. आरोपी टिटवाळ्याच्या मांडा येथील रहिवासी असून, त्याने मृत व्यक्तीचा सावत्र भाऊ असल्याची कबुली दिली. दोन्ही भावांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू होता. या वादातूनच आरोपीने फैजलची हत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत 11 लाख दुबार मतदार, एकाच मतदाराचं 103 वेळा नाव

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT