Anand Dighe’s simplicity and fierce gaze shine through in a rare 27-year-old video shared online; Thane remembers its iconic leader with love and pride. facebook.com/mahendra.barne
मुंबई/पुणे

Anand Dighe Video : एकदम साधेपणा, पण नजरेत करारी बाणा; आनंद दिघेंचा २७ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल

Where to watch Anand Dighe’s 27-year-old rare viral video? : २७ वर्षांपूर्वीचा आनंद दिघेंचा दुर्मिळ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. महेंद्र बारणे यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत दिघेंचा साधेपणा आणि करारी बाणा ठाणेकरांना भावून गेला.

Namdeo Kumbhar

Thane Shiv Sena leader Anand Dighe viral video : बाळासाहेब ठाकरेंचा ढाण्या वाघ, कट्टर शिवसैनिक आनंद दिघे यांना मानणारा ठाण्यात आजही मोठा वर्ग आहे. आनंद दिघे आज आपल्यामध्ये नाहीत, पण ठाणेकर आणि शिवसैनिकांच्या ह्रदयात आजही त्यांचे स्थान कायम आहे. त्यांना मानणारा आजही मोठा वर्ग आहे. सर्वसामान्यांसाठी धावून जाणाऱ्या दिघेंच्या आठवणी आजही ठाणेकरांनी जपून ठेवलेल्या आहेत. एकदम साधेपणा पण नजरेत करारा बाणा असणारे दिघे ठाणेकरांचे दैवतच होय. त्यांचा २७ वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार्यकर्त्याच्या घरी उपस्थिती लावलेल्या व्हिडिओत आनंद दिघे यांचा साधेपणा दिसतोय. या व्हिडिओला तीन दिवसांत एक मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय.

हिंदुत्व आणि मराठी अस्मिता पुढे घेऊन जाणाऱ्या आनंद दिघे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. १९८४ मध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष बनले. अल्पावधीतच ठाणे जिल्ह्यात दिघे प्रचंड लोकप्रिय झाले. पण दिघेंनी आपला साधेपणा सोडला नाही. ते सर्वसामान्यांसाठी कायम उभे राहायचे. कार्यकर्त्यांसाठी धावून जायचे. त्यांच्या सुखात आणि दु:खात सहभागी व्हायचे. त्यांच्या या साधेपणामुळेच ते ठाणेकरांना आपल्या घरातील अन् कुटुंबातील वाटायचे. त्यांचा २७ वर्षांपूर्वीचा असाच एक व्हिडिओ समोर आलेय. कार्यकर्त्याच्या घरी आनंद दिघे गेले होते, त्याचा हा व्हिडिओ आहे. महेंद्र बारणे (Mahendra Barne) यांनी व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. त्यामध्ये आनंद दिघे यांचा करारा बाणा अन् साधेपणा दिसतोय.

"आज 27 वर्ष लग्नाला माझ्या झाली, एक आठवण दिघे साहेबांची. असा नेता परत होणे नाही." असे कॅप्शन टाकत महेंद्र बारणे यांनी दिघेंचा दुर्मिळ व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला अल्पावधीतच लाखो लोखांनी पाहिलाय. कमेंट्स अन् लाईक्सचा पाऊस पडलाय. महेंद्र बारणे यांचं लग्न झाल्यानंतर घरी पूजा होती, त्यावेळी दिघे यांनी उपस्थिती दर्शवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. महेंद्र बारणे यांच्या कुटुंबियांकडून दिघे यांचा सत्कार करण्यात आला. महेंद्र बारणे आणि त्यांच्या पत्नीने दिघे यांचे आशीर्वाद घेतल्याचेही व्हिडिओत दिसत आहे.

महेंद्र बारणे यांच्या घरी आनंद दिघे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित लावली होती. ते अतिशय साधेपणाने आले. बारणे कुटुंबियांशी आत्मीयतेने संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महेंद्र बारणे यांना शुभेच्छा दिल्या. महेंद्र बारणे यांच्या मनात आजही आनंद दिघे यांच्या आठवणी ताज्या आहेत. आनंद दिघे यांच्या वागण्यात अतिशय साधेपणा होता. पण नजरेतील करारा बाणा सर्वांना आकर्षित करणारा असाच आहे. हा दुर्मिळ व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अल्पवधीतच या व्हिडिओला १० लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलेय. व्हिडिओ केमेंट्सचा पाऊसही पडलाय. आयुष्यात आशी माणस भेटणं म्हणजे साक्षात ईश्वर भेटणं, अशी कमेंट्स एका युजर्सने केली आहे. तर अन्य एका युजर्सने म्हटलेय की, "कार्यक्रमाला जात असताना काही तरी भेटवस्तू देणारा एकमेव व्यक्ती म्हणजेच आपले साहेब."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT