धक्कादायक..! ठाण्यात शिवसैनिकावर शाखेत घुसून चाकूहल्ला
धक्कादायक..! ठाण्यात शिवसैनिकावर शाखेत घुसून चाकूहल्ला  Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक..! ठाण्यात शिवसैनिकावर शाखेत घुसून चाकूहल्ला

विकास काटे साम टीव्ही ठाणे

ठाणे : ठाण्यातील Thane वृंदावन सोसायटीचे शिवसेना Shivsena विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर पूर्ववैमनस्यातून अनिस सय्यद याने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना काल रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यानंतर अमित यांच्यावर ऐका खाजगी रुग्णालयात hospital उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या अनिस याच्यावर जमावाने हल्ला केला असून त्यात तो देखील जखमी झाला आहे.

हे देखील पहा-

बाजारपेठेतील एका गाळयाच्या समोरील जागेवरुन अमित जयस्वाल आणि उस्मान सय्यद यांच्यात ३ ते ४ महिन्यांपूर्वी वाद झाला होता. याच वादातून उस्मानला अमित जयस्वालच्या मुलाने मारहाण केली होती. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस Police ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पूर्ववैमनस्यातून बुधवारी रात्री सोसायटीतील शिवसेना शाखेजवळ हा वाद पुन्हा उफाळून आला आहे. उस्मानचा मुलगा अनिस (वय- 30) हा अमित यांना मारहाण करण्यास गेला.

त्याचवेळी अमित यांच्यावर त्याने चाकूने ३ वार केले आहेत. यात गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्ल्यासाठी आलेल्या अनिस याच्यावर देखील एका गटाने दगडाने हल्ला केला आहे. दगड त्याच्या डोक्याला लागल्याने तो यात गंभीर जखमी झाला आहे. त्याला देखील उपचारासाठी कळवा Kalwa येथील छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राबोडी Rabodi पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha election: मुंबई, ठाणे, रायबरेलीसह ४९ जागांवर आज मतदान, ५व्या टप्प्यात या दिग्गजांचं भवितव्य पणाला

Gullak 4 Trailer: अन्नू गुप्ताची प्रेमकहाणी होणार सुरू; नव्या भागात काय असणार गुप्ता कुटुंबाचा वाद

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

SCROLL FOR NEXT