thane schools holiday declared on 19th august 2025 x
मुंबई/पुणे

Thane : मोठी बातमी! मंगळवारी पावसाचा रेड अलर्ट, ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी

Thane News : मंगळवारी (१९ ऑगस्ट) ठाणे शहरातील सर्व शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे सदरचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे.

Yash Shirke

  1. मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे १८ व १९ ऑगस्ट रोजी ठाणे शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

  2. मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर पुणे, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

  3. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून पालक व शाळांना तातडीने सूचना देण्यात आल्या आहेत.

Thane : हवामान विभागाने पुढील तीन दिवसांसाठी राज्यात अलर्ट जारी केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट; पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्टची घोषणा करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. उद्या होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठाणे शहरातील शाळांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने पत्रक जारी केले आहे.

शिक्षण विभाग, ठाणे महानगरपालिकेने केलेल्या पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे:-

उपरोक्त विषयान्वये ठाणे शहरात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या पूर्व प्राथमिक/ प्राथमिक/माध्यमिक / उच्च माध्यमिक / खाजगी अनुदानित/ विना अनुदानित शाळांच्या विद्याध्यांना दि.१८/०८/२०२५ व दि.१९/०८/२०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

आज दुपार सत्रातील बालू असणा-या शाळांतील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी सोडण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांची राहील. तसेच मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थी परी सुखरूप पोहोचल्याची खात्री झाल्याशिवाय आज शाळा मुख्यालय सोडू नये. दि.१८/०८/२०२५ व दि.१९/०८/२०२५ रोजी नियोजित असणारी सर्व प्रशिक्षणे, परोक्षा, इत्यादी नजीकच्या काळामध्ये आपल्या स्तरावर पूर्ण करण्याचे नियोजन करावे. उपरोक्त बाबत सर्व विद्याथ्यांना व पालकांना आपल्या स्तरावरून तात्काळ अवगत करावे.

आठवड्याच्या पहिल्या दिवशी पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस असाच मुसळधार पाऊस बरसू शकतो असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्व मोसमी पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीमुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा जिल्ह्यातील काँग्रेसला खिंडार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय भाजपच्या वाटेवर

फिटनेस-कॅलरी बर्नसाठी घरातच करा 10,000 स्टेप्स वर्कआऊट; जाणून घ्या न्यूट्रिशनिस्टचा सल्ला

Wednesday Horoscope : गुप्त शत्रूंचा त्रास वाढणार, पैशांबाबत घ्यावी लागणार काळजी; 5 राशींच्या लोकांनी जपून राहा

Maharashtra Live News Update: पुण्याच्या जुन्नरमधील बिबट्या शिफ्ट करणार

Best Playing 11 : आश्चर्याचा धक्का! हरमनप्रीत कौरला संघातूनच काढलं, आयसीसीनं बेस्ट टीमचं कर्णधारपद दिलं भलत्याच खेळाडूकडं

SCROLL FOR NEXT