Thane Kalyan Heavy Rain Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Rain : जिल्ह्यात पावसाची संततधार, ठाणे–कल्याण महामार्ग ठप्प, रायतेपूल पाण्याखाली

Thane Kalyan Heavy Rain : संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पुरामुळे ठाणे–कल्याण महामार्गावरील रायतेपूल पाण्याखाली गेला आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक बंद करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Alisha Khedekar

  • ठाणे–कल्याण महामार्गावरील रायतेपूल पाण्याखाली.

  • उल्हास नदीच्या पुरामुळे वाहतूक पूर्णपणे बंद.

  • प्रवाशांना प्रशासनाने पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.

  • परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच वाहतूक सुरू होणार आहे.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे-कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रायतेपूल येथे पुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा मार्ग तात्पुरता थांबविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे.

स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उल्हास नदीच्या पूररेषेच्या (HFL) वर पाणी आल्यामुळे आणि संभाव्य धोके लक्षात घेता, प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाडजवळच्या मुरबाड-म्हाळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रायतेपूल येथे पुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा मार्ग तात्पुरता थांबविण्यात आला आहे.

ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करीत वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या वाहनांना या मार्गावरून जायचे आहे, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या परिस्थितीवर स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभाग लक्ष ठेवून आहेत. पाणी कमी झाल्यावर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच, प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीच्या स्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, दोन माजी नगरसेवकांचा ही जय महाराष्ट्र

Maharashtra Politics: जयंत पाटलांनी करुन दाखवलं; पाटलांनी ईश्वरपूर राखलं'

BMC Election : मनसेसोबतच्या युतीच्या घोषणेआधी ठाकरेंना जोरदार धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याने साथ सोडली

Success Story: भावाच्या पावलावर पाऊल! मोठा भाऊ IAS, लहान भावानेही क्रॅक केली UPSC; उत्कर्ष यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Mahapalika Election : ठाकरे बंधू युतीची घोषणा करण्याआधीच बालेकिल्ल्यात महायुतीची घोषणा, २ दिवसात जागावाटप

SCROLL FOR NEXT