Pradeep Purnekar Death case  
मुंबई/पुणे

Pradeep Purnekar : ठाण्यात शिंदे शासन आहे का? पूर्णेकर प्रकरणानंतर संजय राऊत यांचा पोलीस ठाण्यातून संतप्त सवाल

Pradeep Purnekar Death case : ठाण्यात प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर कापूरबावडी पोलीस ठाण्यासमोर कुटुंबीयांनी पाच तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केले. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित करत मुख्य आरोपींना अटक करण्याची मागणी केली.

Namdeo Kumbhar

Thane Pradeep Purnekar Murder: ठाण्यातील ठाकरे गटाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण तापले आहे. पूर्णेकर कुटुंबीय आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पूर्णेकर कुटुंबीयांचा पोलीस स्टेशनसमोर ठिय्या मांडला तसेच कारवाई केल्याशिवाय मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला. (Pradeep Purnekar murder case latest update Thane)

हत्येतील मुख्य सूत्रधारांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीय आणि समर्थकांनी कापूरबावडी पोलीस स्टेशनसमोर मोर्चा काढून तब्बल पाच तासांहून अधिक वेळ ठिय्या आंदोलन केले. "आरोपींना तात्काळ अटक करून कडक कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही," असा आक्रमक आणि कठोर पवित्रा कुटुंबीयांनी घेतला आहे.

आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात दाखल; पोलिसांना विचारला जाब

घटनेची माहिती मिळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन तपासाच्या संथ गतीबद्दल तीव्र शब्दांत जाब विचारला.

मीनाक्षी शिंदे यांचे नाव FIR मध्ये समाविष्ट करा: संजय राऊत

पोलीस ठाण्यात पत्रकारांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले. मीनाक्षी शिंदे यांचे नाव तात्काळ FIR मध्ये संशयित आरोपी म्हणून दाखल करा. ठाण्यात काय फक्त शिंदेंचेच शासन चालणार आहे का? असा थेट सवाल राऊत यांनी केला. पकडण्यात आलेले आरोपी हे 'डमी' किंवा केवळ भाडोत्री (प्रोफेशनल) असू शकतात. २४ तासांत पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते. मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असून ते देशाबाहेर पळून जाण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आम्ही बेकायदेशीर काहीही मागत नाही. ही हत्या अत्यंत गंभीर असून उद्धव ठाकरेंनी याची दखल घेतली आहे. पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव असू शकतो, पण योग्य कारवाई न झाल्यास बाहेर गर्दी वाढेल आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला.

ही स्पष्टपणे राजकीय हत्या - आदित्य ठाकरे

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. आमचा स्थानिक पोलिसांवर विश्वास असू शकतो, पण यंत्रणेतील इतरांवर नाही. ही थेट राजकीय हत्या आहे असे आदित्य म्हणाले. मागील काही घटना पाहिल्या तर सर्व घडामोडी एकाच राजकीय गटाशी जोडलेल्या दिसतात. आपण कोणाला पाठीशी घालत आहोत, हे मुख्यमंत्र्यांना समजले पाहिजे, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

पोलिसांचे स्पष्टीकरण आणि आश्वासन

ठाकरे गटाच्या नेत्यांचे आरोप आणि पुर्णेकर कुटुंबीयांचा संताप पाहता पोलीस अधिकाऱ्यांनी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला तपासासाठी थोडा वेळ द्या. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुरवणी एफआयआर (Supplementary FIR) मध्ये सर्व संशयित आरोपींची नावे दाखल केली जातील. पोलिसांकडून या प्रकरणात निष्पक्ष आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन आंदोलकांना देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra weather : बळीराजाची चिंता वाढली! राज्यातून मान्सूनची 'एक्झिट; मराठवाडा अन् विदर्भात पावसाची भयंकर तूट

1 Gram Gold Earrings : 1 ग्रॅम गोल्डमध्ये बनवा सोन्याचे कानातले, महिलांसाठी सुंदर ७ डिझाईन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात दोन ऑक्टोबर रोजी होणारे स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थगित

मोठी बातमी! जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या आधी साताऱ्यात ठाकरे गटाला धक्का; बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

सुकन्या समृद्धी योजना, PPF मध्ये गुंतवणूक करताय? सरकारने जाहीर केले नवे व्याजदर, फायदा की झटका?

SCROLL FOR NEXT