Ghodbunder Road Thane saam tv
मुंबई/पुणे

Ghodbunder Road Thane: ठाण्यातील घोडबंदर रोड कधी सुरू होणार, सरकारने दिली नवी डेडलाईन

Thane traffic update: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सर्व महत्त्वाची कामे ३० मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. पावसाळ्यापूर्वी ट्रॅफिक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

Surabhi Jayashree Jagdish

ठाणेकरांसाठी महत्त्वाचा असलेला घोडबंदर रोडवरील सर्व महत्त्वाची कामं ३० मे पर्यंत पूर्ण कऱण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील सर्व कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने कडक भूमिका घेतलीये.

नुकतंच ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी शहरात सुरु असलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या कामाची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी मेट्रो आणि एमएमआरडीए यांच्यासह सर्व यंत्रणांना प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नागरिकांना करावा लागतो ट्रॅफिकचा सामना

घोडबंदरचा हा महामार्ग ठाण्यातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. त्याचप्रमाणे पूर्व आणि पश्चिम जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. कापूरबावडीच्या पुढे राहणाऱ्या नागरिकांसाठी हा रस्ता ठाणे स्टेशनकडे तसंच जाण्यासाठी हा सर्वात जलद पर्याय मानला जातो. मात्र पावसाळ्यात या रस्त्यावर सतत पाणी साचणं, सुरु असलेली कामं आणि अरूंद रस्ते यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा सामना करावा लागतो.

गुरुवारी करण्यात आलेल्या या पाहणीत इस्टर्न एक्सप्रेस हायवे, कापूरबावडी जंक्शन, सर्व्हिस रोड्स तसंच गायमुख घाट परिसराचाही समावेश होता. विशेषतः गायमुख चौपाटीसमोर रस्त्याच्या कडेला तातडीने काँक्रीटीकरण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले.

मेट्रोच्या खांबांखालील रस्ते आणि स्लिप रोड्सचे काँक्रीटीकरण, सेवा रस्ता मर्जिंग, पेव्हर ब्लॉक बसवणं, स्लिप रोडची दुरूस्ती, चौकांचं सुशोभीकरण, विजेच्या खांबांचं शिफ्टींग आणि पाईपलाईन हलवणं अशा विविध कामांवर भर देण्यात आला.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहितीनुसार, वाहतूक व्यवस्थेसाठी रस्त्यांवर आयलँड, बसथांबे, रिक्षा स्टँड उभारणं तसंच पार्किंग आणि नो-पार्किंगचे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे येत्या पावसाळ्यात घोडबंदर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या पाहणी दरम्यान विद्यार्थी शाळेत कचरा काढताना निदर्शनास

शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढेल हे 1 फळ, रोज न चुकता खा

Childhood Cancer : दृष्टी धूसर होणे, डोळे चुरचुरणे ही लक्षणे कॅन्सरची असतात का? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

मोठी बातमी! आमदारांच्या PA आणि वाहनचालकांच्या पगारात भरघोस वाढ

SCROLL FOR NEXT