Jitendra Awhad on Thane Municipal Corporation
Jitendra Awhad on Thane Municipal Corporation Saam TV
मुंबई/पुणे

Jitendra Awhad : ठाण्यातील वाहतूक कोंडीवरून पालिकेवर संतापले जितेंद्र आव्हाड, ट्वीट करत केला राग व्यक्त

Satish Kengar

Jitendra Awhad on Thane Municipal Corporation : ''कोणत्याही प्रकारचे नियोजन न करता एकाचवेळेस शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. त्याचा फटका सबंध ठाणे शहराला बसला असून वाहतूक कोंडीची तीव्रता अधिकाधिक वाढू लागली आहे,'' असं राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

ते ट्वीट करत असं म्हणाले आहेत. आपल्या ट्विटमधून त्यांनी ठाणे पालिकेला लक्ष्य केलं आहे.

ट्वीट करत ते म्हणाले आहेत की, संपूर्ण ठाण्यात रस्त्यांची कामे चालू आहेत. जागोजागी खड्डे पाडून ठेवले आहेत. रस्ते खोदून ठेवले आहेत. याचे काही नियोजन केले आहे, असे काही दिसून येतं नाही. हजारो कोटींचे रस्ते होतं आहेत ही चांगली गोष्ट आहे. पण, या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाहीत.''  (Latest Marathi News)

आव्हाड म्हणाले, ''1 जून ते 1 ऑक्टोबर कामे करता येत नाहीत. तसा शासकीय नियम आहे. ही कामे जरी केली तरी त्याचा दर्जा कसा असेल, असा प्रश्न उपस्थित करून, हे हजारो कोटी जे ठाण्याच्या विकासासाठी आणले आहेत, ते पाण्यात वाहून गेले हे मनाला न पटणार आहे.''

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ''ठाणेकरांना वाहतूक कोंडीचा जो त्रास होतं आहे, तासन तास एका जागी जे उभे रहावे लागते. याला जबाबदार कोण? विशेष म्हणजे, वाहतूक विभागाला कोणतीही पूर्वासूचना न देता, त्यांच्याकडून ना हरकत दाखला न घेता त्यांना अंधारात ठेवून कामे सुरु केली आहेत. त्यामुळे पोलिसांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही.''

ते म्हणाले की, ठाणे महानगरपालिकेने हे सगळं तपासायला हवं होतं. महानगरपालिका डोळ्यावर पट्टी बांधून काम करीत आहे. त्यामुळे त्यांनी ते काही तपासले असेल असे मला वाटत नाही. या वाहतूक कोंडीसाठी कोणी जबाबदार व्यक्ती आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! ट्रॅव्हिस हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'

Uddhav Thackarey: जे अदानी- अंबानींना दिलं ते काढून घेणारं का? उद्धव ठाकरेंचा पीएम मोदींना सवाल

Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Politics : शरद पवारांचं एक विधान अन् राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा पाऊस, कोण काय म्हणालं?

13 लिटरची मोठी इंधन टाकी, स्पोर्टी लूक; Yamaha FZ S Fi दोन नवीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च

SCROLL FOR NEXT