Thane School  SAAM TV
मुंबई/पुणे

Schools Closed Tomorrow in Thane : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Thane Rain News : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.

विलास काटे

Thane News : मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात आज दिवसभर मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यातही पावसाचा जोर दिवसभर कायम आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचलंआहे. ठाण्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा परिषदेने जाहीर केले आहे.

ठाणे जिल्हात सद्यस्थितीतील अतिवृष्टी (Heavy Rain) विचारात घेऊन व हवामान वर्तवण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीच्या पहिली ते बारावीच्या विदयार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. या पार्श्वभूमीवर शालेय विदयार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हातील सर्व शाळांना 28 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील पाऊस

मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली भागात मागील 12 तासांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दहिसर परिसरात 100-170 मिमी आणि कल्याणजवळील भागात 140 मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईतही 60-100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. (Latest News)

उद्या पावसाचा अंदाज

ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, भंडारा, गोंदिया या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirpur Police : सराईत गुन्हेगाराची पोलिसांच्या हातावर तुरी; शिरपूर पोलीस ठाण्यातून पसार

Shocking : अंत्यसंस्कारानंतर महिलेच्या अस्थींची चोरी, कुठे घडला धक्कादायक प्रकार? VIDEO

Crime News : भावकीनं केला घात! शेतीच्या वादातून महिलेवर हल्ला, बीड जिल्ह्यात खळबळ

Maharashtra Live News Update : पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन

Shocking: सुंदर दिसण्यासाठी 'फॉक्स आइज' सर्जरी केली, संसर्ग होऊन सोशल मीडिया इन्फ्यूएन्सरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT