Thane News Saam Digital
मुंबई/पुणे

Thane News : डॉक्टरांनी ९ वर्षांच्या मुलाच्या पायाऐवजी गुप्तांगाची केली सर्जरी; ठाण्यातील घटनेने खळबळ

Thane News Update : ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील रुग्णालयात डॉक्टरांनी एका ९ वर्षांच्या मुलाच्या पायाऐवजी गुप्तांगावर शस्त्रक्रिया केल्यामुळे खळबळ माजली आहे. पालकांनी याविरोधात पोलिसात तक्रा दिली आहे.

Sandeep Gawade

सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी एका ९ वर्षांच्या मुलावर चुकिची शस्त्रक्रीया केल्यामुळे खळबळ माजली आहे. मुलाच्या पायाला जखम झाली होती. त्यावर शस्त्रक्रीया करण्याऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील रुग्णालयात हा प्रकार घडला असून याविरोधात मुलाच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पालकांच्या तक्रारीनतंर आरोग्य अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनीही संबंधितांवर योग्य ती वारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे.

पालंकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात गेल्या महिन्यात त्यांच्या मुलाच्या पायाला मित्रांसोबत खेळत असताना दुखापत झाली. त्याला १५ जून रोजी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी नुकतीच त्याच्यावर शस्त्रक्रिया केली. मात्र निष्काळजीपणाचा कळस म्हणजे डॉक्टरांनी जखमी पायाऐवजी त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांच्या चुकीच्या ठिकाणी सर्जरी केल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानंतर डॉक्टरांनी लगेचच त्याच्या जखमी पायावर शस्त्रक्रिया केल्यांचं त्यांनी सांगितली.

याप्रकरणी पालकांनी शहापूर पोलिसात तक्रारही दिली आहे. याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी या तक्रारीची चौकशी सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जिल्हा सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार म्हणाले की, आरोग्य अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. वैद्यकीय अधिकारी गजेंद्र पवार यांनी, त्याच्या पायाच्या दुखापतीव्यतिरिक्त, मुलाला फिमोसिस (घट्ट फोरस्किन) ची समस्या देखील होती. त्यामुळे आम्हाला दोन शस्त्रक्रिया कराव्या लागल्याचं सांगत सारवासारव केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Post: ट्रांस्परंट पाकिटात डिलिव्हर झाली 'ती' खाजगी वस्तू, ऑफइसमध्ये सर्वांसमोर व्हावे लागले लज्जीत

Health: टवटवीत चेहरा आणि काळ्याभोर केसांसाठी उपयुक्त ठरेल तुमच्या किचनमधील 'हा' पदार्थ; सुरकुत्याही म्हणतील बाय बाय

Maharashtra News Live Updates: दिलीप वळसे पाटील देवगिरीवर अजित पवारांच्या भेटीला

Nagpur : धक्कादायक.. कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आढळली तीन महिन्यांच्या चिमुकली

People born in December: अत्यंत भाग्यशाली असतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोकं, स्वभावातला 'हा' गुण तुम्ही देखील अनुभवला असेल

SCROLL FOR NEXT