Wangani station Saam Tv
मुंबई/पुणे

Bhiwandi News : रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून भिवंडीच्या खासदारांची फसवणूक

Vangani Station : रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी वांगणी रेल्वे स्टेशनवरील लिफ्टचे काम करण्याचे आश्वासन दिले होते. ४ वर्षांपूर्वी मंजुरी मिळालेल्या काम बंद असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे रेल्वेने फसवणूक केल्याचे लोक म्हणत आहेत.

Yash Shirke

मयुरेश कडव, साम टीव्ही, प्रतिनिधी

निगरगट्ट रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा उत्तम नमुना वांगणी स्टेशनमध्ये पाहायला मिळतोय. याठिकाणी रेल्वे प्रशासनाने खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना लेखी उत्तर देऊनही लिफ्टचं काम पूर्ण केलेलं नाही. 28 फेब्रुवारीपर्यंत वांगणी रेल्वे स्थानकातील लिफ्ट सुरू होईल असं आश्वासन रेल्वेकडून देण्यात आलं होतं. संतापजनक बाब म्हणजे रेल्वेनं याठिकाणी लिफ्टचं कामच सुरू केलेलं नाही.

वांगणी रेल्वे स्थानकावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करतात. वांगणी रेल्वे स्थानकावर पश्चिमेला अडीच वर्षापूर्वी लिफ्ट उभारण्याचं काम सुरू करणयात आलं. एका वर्षानंतर हे काम अचानक बंद करण्यात आलं. काम पूर्ण व्हावं यासाठी वांगणी रेल्वे प्रवासी संघटनेनं 29 डिसेंबर 2024 रोजी खा. बाळ्यामामा म्हात्रे यांना पत्र दिलं. लिफ्टसोबत 4 वर्षापूर्वी मंजुरी मिळालेल्या सरकत्या जिन्याचं काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली.

त्यानंतर 1 जानेवारी 2025 रोजी खा.बाळ्यामामा यांनी मध्य रेल्वेच्या DRMना पत्र पाठवून सदर काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. यावर 5 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबई विभागाचे ADRM शशी भूषण यांनी वांगणी रेल्वे स्थानकावरील लिफ्टचं काम 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण होईल तसंच सरकत्या जिन्याचं काम 31 मार्च 2025 पर्यन्त पूर्ण होईल असं उत्तर पत्राद्वारे दिलं.

मात्र प्रत्यक्षात लिफ्ट आणि सरकत्या जिन्याचं कोणतंही काम सुरूच झालं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उद्दाम रेल्वे प्रशासनानं खासदारांची फसवणूक केल्याचा आरोप रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मनोहर शेलार यांनी केलाय. तसच प्रवासांच्या भावनांशी खेळणाऱ्या बेजबाबदार अधिकारी आणि ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्याकडे केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT