Thane Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Metro Trial : ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरले, सोमवारी मेट्रो धावणार, या दिवशी होणार उद्घाटन

Thane Metro 4A Trial Run: ठाणेकरांंसाठी दिलासादायक बातमी आहे. आता सोमवारी मेट्रो 4A'ची ट्रायल रन होणार आहे. आता लवकरच मेट्रो सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

ठाणेकरांना दिलासा

मेट्रो 4A चं ट्रायल रन होणार

सोमवारी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा

ठाणेकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. ठाण्यात आता मेट्रो धावणार आहे. ठाणेकरांची वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. ठाणे शहरात 'मेट्रो 4A'चं ट्रायल रन होणार आहे. घटस्थापनेच्या दिवशी ही ट्रायल रन घेतली जाणार आहे. २२ सप्टेंबर म्हणजेच सोमवारी ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीती ट्रायल रनला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

मेट्रो 4Aची ट्रायल रन होणार (Metro 4a Trial Run)

ठाण्यातील मेट्रो 4A हा बहुप्रतिक्षित प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टमुळे ठाणेकरांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या ट्रायल रन होणार आहे. थोड्याच दिवसात मेट्रोलदेखील प्रवाशांसाठी सुरु होईल.

एमएमआरडीएकडून वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो 4च्या कॉरिडोरचे काम सुरु आहे. हा ३२.३ किमी लांबीचा मार्ग असणार आहे. याचसोबत हा मार्ग पुढे गायमुखपर्यंत विस्तार केला जाणार आहे. यातील कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. हा टप्पा १०.५ किमी लांबीचा आहे. ट्रायल रन आणि सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतर ही मेट्रो सुरु केली जाईल. वर्ष अखेरपर्यंत ही मेट्रो प्रवाशांसाठी सुरु होण्याची अपेक्षा आहे.

ठाण्यातील मेट्रोची स्थानके (Thane Metro 4A Metro Stations)

मेट्रोच्या या मार्गात कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावाडी, मानपाडा, टिकूजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गव्हाणपाडा, गायमुख ही स्थानके असणार आहेत.

मेट्रो 4 ला जोडून पुढे मेट्रो 4A असणार आहे. मेट्रो 4 ३२.३२ किमी लांब तर मेट्रो 4A २.७ किमी लांब असणार आहे. या दोन्ही मार्गात ३२ स्टेशन असणार आहे. वडाळा ते कासारवडवलीपर्यंतचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, कासारवडवली ते कॅडबरी जंक्शन हा मार्ग डिसेंबर २०२५ पर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

अयोध्येतील राममंदिरावर भगवा ध्वज, काय आहे वैशिष्ट्यं ?

Local Body Election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा सिक्सर,शिंदेसेनेत एकाच घरात 6 उमेदवार

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

SCROLL FOR NEXT