Pratap SarnaiK announcement on Thane Mira Bhayandar metro News : ठाणे आणि मीरा भाईंदर या भागातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. डिसेंबर महिन्यात या दोन्ही ठिकाणी मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे. मेट्रो मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही मेट्रो प्रवासांच्या सेवेत कधी येणार, याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी MMRDA ला मेट्रो ९ आणि मेट्रो ४ डिसेंबर महिन्यात सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी त्यांनी तारीखही सांगून टाकली आहे.
ठाणे आणि मीरा-भाईंदर क्षेत्रातील रहिवाशांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेट्रो ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत तर मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर अखेर सुरू होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबधित विभागाला तसे निर्देश दिले आहेत. सोमवारी MMRDA कार्यालयात बोलावलेल्या बैठकीत सरनाईकांनी मेट्रो डिसेंबरपर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले. या बैठकीला महानगर विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विनीकुमार मुदगल, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, मिरा- भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधा बिनोद शर्मा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
याबरोबरच मेट्रोच्या पुलाचे काम करत असताना त्याखालील मोकळ्या जागेमध्ये भविष्यात अतिक्रमण होऊन ते विद्रूप होऊ नये, यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या धर्तीवर येथे सुशोभीकरण करून उद्याने उभी करावीत, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मेट्रो ४ मार्गावर यशस्वी चाचणी झाली आहे. तसेच मेट्रो ९ मार्गावरही चाचण्या सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत ठाणे आणि मीरा भाईंदर या भागात मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई मेट्रो-४ (वडाळा – कासारवडवली) आणि त्याचा विस्तार मार्ग-४अ (कासारवडवली – गायमुख) या मार्गांवर ३२ स्थानके आहेत. मार्ग-४ मध्ये ३० स्थानके आहेत, तर ४अ मध्ये २ स्थानके आहेत. मुंबई मेट्रो-४ चा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत सुरू होणार आह. मेट्रो ९ मधील पहिला टप्पा दहिसर (पूर्व) ते काशीगाव हा डिसेंबरमध्येच सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात ४ मेट्रो स्थानके असून ४.९७३ किमीचा मार्ग असेल. मेट्रो-९ कॉरिडॉरचे बांधकाम २०१९ पासून सुरू आहे. या पूर्ण मार्गावर ऑक्टोबर २०२४ पर्यंत सेवा सुरू करण्याचे नियोजन होते. विलंब आणि इतर कारणांमुळे मेट्रो सेवा अद्याप सुरू झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.