मेट्रो १० च्या कामाला सुरुवात
गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) मेट्रोचं काम सुरु होणार
घोडबंदरची वाहतूक कोंडी फुटणार
ठाणेकरांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता लवकरच घोडबंदरमधून मेट्रो धावणार आहे. यामुळे घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. प्रवाशांना काहीच त्रास होणार नाही.ठाणे आणि मीरा भाईंदर परिसरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. हीच वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (घोडबंदर) मेट्रो सुरु करणार आहे. याचसोबत हा रस्ता रुंदीकरणालादेखील मंजुरी मिळाली आहे.
मेट्रो १०चे काम लवकरच सुरु होणार (Thane Ghodbunder Metro 10)
मेट्रो १० प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काशीगाव ते दहिसर चेक नाका या महत्त्वाच्या जोडण्याचे काम सुरु आहे. यानंतर पुढच्या आठवड्यात गायमुख ते छत्रपती शिवाजी महाराज चौक यासाठी मेट्रो प्रकल्पाची निविदा सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्र्यांनी दिली आहे. हा मार्ग ९७ किमी असणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एमएमआरडीएच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.
दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गाचा विस्तार करुन तो पुढे गायमुखपर्यंत नेण्यात येणार आहे. यासाठी ८,५५३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.पुढील ३-४ महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. २०२९ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
रस्ता रुंदीकरणाचेही काम होणार
या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे. घोडबंदरवरील वाहतूक कोंडी लक्षात घेता रस्ता रुंदीकरणाचा विचार करण्यात आला आहे. हा रस्ता ३० मीटरवरुन ६० मीटरपर्यंत रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.