Thane Hit And Run Case Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Accident: ठाण्यात हिट अँड रनचा थरार, मर्सिडिजने तरुणाला चिरडलं

Thane Hit And Run Case: नौपाड्याच्या नितीन जंक्शनजवळ मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव मर्सिडीज कारने तरुणाला जोरदार धडक दिली.

Priya More

ठाण्यामध्ये हिट अँड रनची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नितीन जंक्शन परिसरात भरधाव मर्सिडीज कारने तरूणाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताचा तपास नौपाडा पोलिस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नौपाड्याच्या नितीन जंक्शनजवळ मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव मर्सिडीज कारने ठाण्यातील ज्ञानेश्वरनगर या ठिकाणी राहणाऱ्या तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. दर्शन हेगडे (२१ वर्षे) असं या मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

दर्शन हेगडे दुचाकीवरून टी. एम. सी सर्कलवरून वागळे इस्टेटकडे जात होता. त्याचवेळी भरधाव आलेल्या मर्सिडीज कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. वाहतुकीचे नियम तोडून कारने दर्शन हेगडेच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दर्शनच्या डोक्याला, हात आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पळून गेला.

या अपघातामध्ये दुचाकीचे मोठे नुकसान झाले. त्यासोबत कारच्या पुढील भागाचे नुकसान झाले. अपघातानंतर कारचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्याने जखमी दर्शनला रुग्णालयात देखील नेले नाही. या प्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करत कार चालकाविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कार चालकाचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Electric Bike Launch : बाईक रायडर्ससाठी गुड न्यूज! फक्त २५ पैशांमध्ये १ किमी धावेल ही इलेक्‍ट्रिक टू-व्हीलर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Palghar News: जीवावर उदार होऊन शिक्षणासाठी दररोज नदी पार करणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष कधी थांबणार? VIDEO

Maharashtra Live News Update: आमदार संग्राम जगताप यांना गोळी घालण्याची धमकी; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

Hunger Causes : असा कोणता आजार आहे ज्यात प्रचंड भूक लागते?

Jalna Crime : मुलीच्या छेडखानीला विरोध करणाऱ्या पित्याला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT