Thane News: Saam tv
मुंबई/पुणे

Thane Fire News: ठाण्यात अग्नितांडव! बंगल्याला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, तीन जखमी

Thane Latest News In Marathi: ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील वाघबीळ नाका येथील माधवी निवास बंगल्याला आग लागल्याची घटना घडाली.

Vishal Gangurde

Thane Fire News

ठाण्याच्या घोडबंदर रोड वरील वाघबीळ नाका येथील माधवी निवास बंगल्याला आग लागल्याची घटना घडाली. आज शनिवारी पहाटेच्या सुमारास बंगल्याला ही आग लागली. बंगल्याला लागलेल्या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील (Thane) घोडबंदर रोडवरील वाघ बीळ नाका परिसरातील 'माधवी निवास' या बंगल्याला आग लागल्याची घटना घडली. बंगल्याला लागलेल्या आगीत पहिल्या मजल्यावरील घराला पहाटेच्या सुमारास आग लागली. घराला लागलेल्या आगीत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर या बंगल्यात एकूण पाच जण राहत होते.

पहाटे बंगल्याला लागलेली आग सध्या आटोक्यात आली आहे. या आगीत (Fire) दोघांना जीव गमवावा लागला आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

घटनास्थळी नेमकं काय घडलं?

ठाण्यातील वाघबीळजवळील माधवी बंगल्याला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत घरातील सदस्य अभिमन्यू मढवी,रमाबाई मढवी हे बेशुद्ध अवस्थेत आढळले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

आग लागली त्यावेळी घरात एकूण ०५ व्यक्ती घरामध्ये अडकल्या होत्या. त्यातील ०३ व्यक्ती स्वतःहून बाहेर पडल्या. मात्र, दुसऱ्या मजल्यावर ०२ व्यक्ती अडकल्या होत्या. त्यांना अग्निशमन दलाच्या जवानांनी घरात बाहेर काढण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेतच नजीकच्या रुग्णालयात दाखल केलंल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

मुसळधार पाऊस अन् ताशी ६० किमी वेगाचं वादळ; २३ राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT