Thane Cylinder Blast Twitter/@ANI
मुंबई/पुणे

ठाण्यात मध्यरात्रीच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट; चौघे जखमी

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे - कळवा येथील शिवशक्ती नगर या परिसरात एका घरगुती गॅस सिलेंडर (Cylinder) कंपनीच्या एजन्सीमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या अपघातात 4 कामगार जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. सत्यम यादव (२०), अनुराज सिंह (१९), रोहीत यादव (२०), गणेश यादव (१९) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण ८० ते ९० टक्के भाजले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कळवा पूर्व परिसरातील आनंद विहार बिल्डिंग मागे शिवशक्ती नगरात ही घटना घडली आहे. या घटनेत जमखी झालेल्या कामगारांना कळवा येथे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार 80 ते 90 टक्के भाजले असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांवर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी कळवा पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी 1-रेस्क्यू वाहनसह उपस्थित होते. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT