Thane News: ठाण्यात एका ३० वर्षीय महिलेने चार जणांसह प्रियकराला मारहाण करून लाखो रुपयांचा ऐवज लुटला आणि त्याला शहापूर महामार्गावर विवस्त्र करून फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बालाजी असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून भाविका आणि नदीम अशी पाचपैकी दोन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित बालाजी हा शहापूर येथील रहिवासी असून बांधकामाचा व्यवसायिक आहे. त्याचे गेल्या काही वर्षांपासून शहापूर येथील भाविकाशी प्रेमसंबंध होते. 28 जून रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारास भाविकाने बालाजीला शहापूर येथील आटगाव महामार्गावरील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावले.
याठिकाणी हे दोघे बोलत असताना भाविकाचे चार साथीदार तेथे आले आणि त्यांनी बालाजीला जबर मारहाण केली. मारहाण केल्यानंकर आरोपींनी बालाजीचे कपडे काढून त्याचा विवस्त्र व्हिडिओ काढला आणि नंतर दुसर्या दिवशी पहाटे त्याला नग्न अवस्थेत शहापूर महामार्गावर फेकून दिले, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
या घटनेनंतर बालाजीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपासून त्याच्याव उपचार सुरू आहेत आणि आता तो या धक्क्यातून हळूहळू सावरतोय. भाविकाविषयी विचारल्यानंतर बालाजी म्हणाला "मी तिच्यासाठी सर्वकाही केले. तिच्या इच्छेनुसार एक छोटेसे घर बांधलं. तिच्यासाठी प्रत्येक वेळी शॉपिंग केली, तिला हवं ते घेऊन दिलं. तिची प्रत्येक इच्छा मी माझी आज्ञा मानली. तिने दुसर्या माणसासाठी माझा विश्वासघात केला आणि माझ्यावर क्रूरपणे प्राणघातक हल्ला केला."
बालाजीने सांगितले की, भाविकाने त्याला भेटण्यासाठी बोलवलं तेव्हा तिने काही गिफ्ट, साडी, सोन्याचे झुमके, सोन्याचे पैंजन आणि बांगड्या, नवीन शूज आणि छत्री अशा भेटवस्तू घेऊन येण्यास सांगतिले. मी या सर्व भेटवस्तू घेऊन तिला भेटण्यासाठी पोहोचलो, तेव्हा ती आटगाव महामार्गावर माझ्या कारमध्ये बसली आणि माझ्याकडील सर्व भेटवस्तू घेतल्या. त्यानंतर अचानक चार जण कारमध्ये घुसले. त्यांनी मला बाजूला ढकलले आणि माझ्यावर चॉपरने हल्ला केला. त्यापैकी एक जण गाडी चालवायला लागला." (Tajya Marathi Batmya)
यानंतर आरोपींनी बालाजीला यांना एका बंद अज्ञात रेस्टॉरंटमध्ये नेले आणि सकाळपर्यंत त्याला जबर मारहाण केली, अशी माहिती शहापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार उपासे यांनी दिली. बालाजीने पोलिसांना दिलेल्या जबाबत म्हटले की "आरोपींनी त्याचे कपडे काढल्यानंतर व्हिडिओही काढला. त्यांनी त्याच्या दोन सोन्याच्या साखळ्या, सात अंगठ्या काढून घेतल्या आणि त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. त्यानंतर सॅमच्या आसपास पळून गेले." (Latest Political News)
यानंतर स्वत:चा बचाव करण्यासाठी बालाजीने पोलीस स्टेशन गाठले आणि मदतीसाठी त्याच्या मित्रांना बोलावले. यानंतर मित्रांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पाच आरोपींवर आयपीसी कलम ३६५ (एखाद्या व्यक्तीला गुपचूप आणि चुकीच्या पद्धतीने बंदिस्त करण्याच्या हेतूने अपहरण किंवा अपहरण), ५०६ (गुन्हेगारी धमकी) तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस आरोपींचा शोध आहेत. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.