Thane Bus Service Saam tv
मुंबई/पुणे

Thane Bus Service : ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार; डबल डेकर बसच्या सफारीचाही आनंद घेता येणार

thane electric bus service : ठाणेकरांना दिलासा देणारी बातमी हाती आलीये. ठाणेकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. तसेच ठाणेकरांना डबल डेकर बसच्या सफारीचाही आनंद घेता येणार आहे.

विकास काटे, ठाणे

ठाणे : ठाणेकरांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेत नव्या १२३ इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. तसेत उर्वरित १८० इलेक्ट्रिक एसी बस घेण्यासाठी देखील निविदा मागवण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित एसी बस टप्याटप्याने नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे ठाणेकरांना प्रवास गारेगार होणार आहे.

ठाणेकरांच्या सेवेत १० डबल डेकर बसचा देशील समावेश असणार आहे. या डबल डेकर बसच्या सफारीचा आनंद ठाणेकरांना वर्षभरात घेता येणार आहे. पीएमई योजनेअंतर्गत आणखी १०० बस वर्षभरात दाखल होणार असल्याची देखील माहिती हाती आली आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास आणखी सुखकर होण्याची शक्यता आहे.

ठाणे परिवहन सेवेत ३६० बस आहेत. या बस ठाण्यासह बोरिवली, मुंबई, भिवंडी आदींसह इतर मार्गावर धावत आहेत. ३६० पैकी १२३ बस या इलेक्ट्रिक वातानुकुलीत बस आहेत.

आर्थिक वर्षात परिवहनच्या अर्थसंकल्पात डबल डेकर बसचा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर बस आल्यानंतर कोणत्या मार्गावर सोडल्या जाऊ शकतात, याचाही अभ्यास करण्यात आला होता. या डबल डेकर बसचा मार्ग देखील आता सुकर होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. वर्षभरात ठाणेकरांच्या सेवेसाठी १० डबल डेकर बस दाखल होणार आहेत.

मुंबईत बेस्ट सेवेसाठी आंदोलन

मुंबई बेस्ट बस सेवेचा मुद्दा बेस्ट बचाओ आंदोलनाने घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने नव्या बस गाड्या विकत घेण्यासाठी बेस्ट प्रशासनाला लवकरात लवकर निधी दिला नाही, तर डिसेंबर 2025 नंतर बेस्ट ही सार्वजनिक परिवहन सेवा बंद पडेल, अशी भीती बेस्ट बाचाओकडून व्यक्त होत आहे. यासाठी 7 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान निवेदन दिलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air Pollution : राजधानीची हवा अत्यंत विषारी! शाळा बंद, वाहनांना बंदी, दिल्लीमध्ये अनेक निर्बंध

Weather Update : थंडीची चाहूल, कमाल अन् किमान तापमानात घट

Assembly Election: साकोलीचं महाभारत ! जातीय समीकरण कुणाच्या पथ्यावर? पटोलेंपुढे अविनाश ब्राह्मणकरांचं आव्हान

Horoscope Today : काहींना नको असलेल्या गोष्टींचा होईल त्रास, तर कोणाचे शत्रू काढतील डोके वर, वाचा तुमचे आजचे राशिभविष्य

Horoscope: कुंभ राशीचं करिअर, लव्ह लाईफ आणि आरोग्याच्या दृष्टीने कसा असेल आजचा दिवस; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT