Worli Sea Link Businessman jumps to Death Saam TV marathi
मुंबई/पुणे

Worli Sea Link : मुंबईत खळबळ! ठाण्याच्या उद्योजकाची आत्महत्या, वरळी सी-लिंकवरून टाकली उडी

Worli Sea Link News : मुंबईतील वरळी सी-लिंकवरून ठाण्यातील ५१ वर्षीय उद्योजकाने समुद्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार व्यवसायातील आर्थिक अडचणी हे कारण असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

Worli Sea Link Businessman jumps to Death: मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवर एक धक्कादायक प्रकार घडला. ठाणे येथे राहणाऱ्या ५१ वर्षांच्या भावेश नवलचंद्र मजेठिया या कपड्यांच्या व्यापाऱ्याने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. मळमळत असल्याचा बहाणा करून भावेश यांनी धावती टॅक्सी थांबवायला लावली. त्यानंतर क्षणाचाही विचार न करता त्यांनी समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक अंदाजानुसार, व्यवसायातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आलेल्या मानसिक तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, समुद्रातील खवळलेल्या लाटांमुळे बचावकार्यात विलंब झाला, परंतु नंतर मुंबई पोलिसांनी मजेठिया यांचा मृतदेह बाहेर काढला. आर्थिक अडचणीमुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. वरळी पोलीस ठाण्यात याबाबत अपघाती मृत्यूची नोंद (ADR) करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेची माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. मजेठिया यांना नायर रुग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीची खात्री करण्यासाठी पोलीस संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मजेठिया शुक्रवारी सकाळी सुमारे साडेदहा वाजता आपल्या कुटुंबीयांना आपण कामावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी टॅक्सीतून सी-लिंकवरून उडी घेतली. त्यांनी आपला फोन आणि बॅग उडी मारण्याआधी टॅक्सीमध्येच ठेवल्याचेही समोर आले.

दरम्यान, त्यांचे कुटुंबीय त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते, पण कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. जेव्हा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी त्यांच्या फोनवर येणाऱ्या कॉलला उत्तर दिले. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये कपड्यांचे दुकान चालवणाऱ्या मजेठिया यांना व्यवसायात मोठे नुकसान झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : रक्षाबंधन अखेरचं ठरलं! दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबातील ४ जणांना ट्रकने उडवलं; बहीण भावाचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

September Rule Changes: दुधापासून ते LPG सिलिंडरपर्यंत... १ सप्टेंबरपासून बदणार हे ९ नियम; सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार परिणाम

Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

Krishna Janmashtami 2026 : 4 की 5 सप्टेंबर? यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT