ATS arrested maoist in nalasopara saam tv
मुंबई/पुणे

नालासोपाऱ्यात ATS च्या जाळ्यात अडकला नक्षलवादी, सापळा रचून केली अटक

नालासोपाऱ्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : नालासोपाऱ्यात एका धक्कादायक घटनेमुळं खळबळ उडाली आहे. नालासोपाऱ्यातील धाणीव बागमध्ये लपून बसलेल्या एका नक्षलवाद्याच्या (Thane ATS) ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. कारु हुशाला यादव (४५) असं अटक केलेल्या नक्षलवाद्याचं नाव आहे. यादव कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटेनेचा काम करत होता. नक्षलवादी यादववर १५ लाखांचा इनाम ठेवण्यात आला होता. (Anti Terrorism Squad arrested Maoist in Nalasopara)

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमधील नक्षलवादी कारु हुशाला यादव हा उपचारासाठी मुंबईत दाखल झाला होता. यादव नालासोपाऱ्यातील पूर्व धाणीव बाग येथील रामनगर येथील एका चाळीत लपून बसला होता. त्यानंतर ठाणे दहशतवाद विरोधी पथकाने सापळा रचून यादवला अटक केली.

यादव २००४ पासून माओवादी संघटनेचे काम करत असून त्याच्यावर सरकारने १५ लाखांचा इनाम ठेवला होता. झारखंड पोलिसांनी तो मुंबईत दाखल झाल्याची माहिती दिली होती.त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Water : पाण्याने भरलेले शहाळे कसे ओळखावे? लक्षात ठेवा 'ही' सिंपल ट्रिक

Maharashtra Live News Update: येवला शहरातील वाईन शॉपमध्ये चोरी; घटना सीसीटीव्हीत कैद

Face Hair Removal Tips : हनुवटी-ओठांच्या वर केस वाढतात? आतापासून वापरा 'हे' घरगुती फेसपॅक

Cardamom Benefits: रोज दिवसभर २ वेलची खाल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

लाडकी बहीण योजनेचे ४५०० रुपये कोणाला मिळणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT