Raza Academy: मदरशांच्या मुद्द्यांवरुन मुस्लिमांना लक्ष्य केलं जातंय; रझा अकादमीचं राष्ट्रपतींना पत्र

Raza Academy Letter To President: जे मदरसे मुस्लिम समाजाकडून पैसे काढून चालवले जात आहे अशा मदरशांवर कारवाई करू नये अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
Raza Academy Letter To President
Raza Academy Letter To PresidentSaam Tv
Published On

मुंबई: देशात मदरशांच्या मुद्द्यावरुन विविध मत-मतांतरे आहेत. अनेक हिंदुत्ववादी नेत्यांनी आणि संघटानांची मदरशांबाबत (Madrasa) कठोर भूमिका मांडली आहे. याबाबत रझा अकादमी (Raza Academy) आणि ऑल इंडिया सुन्नी जमियत उल उलमा यांच्यातर्फे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिण्यात आले आहे. या पत्रात मदरशांच्या सुरक्षेबाबत मुस्लिम समाजाला लक्ष्य केलं जात असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. (Raza Academy Letter to President)

Raza Academy Letter To President
Nandurbar News: तब्बल ४७ दिवसांनंतर विवाहितेवर अंत्यसंस्कार; मुलीच्या संशयास्पद मृत्यूमुळे वडिलांनी उभारला लढा

रझा अकादमीने राष्ट्रपतींनी लिहीलेल्या पत्रातून (Letter) मुस्लिम समाजाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. पत्रात लिहीलं की, आसाममध्ये ज्या पद्धतीने मदरशांवर कारवाई केली गेली, यूपीमध्ये मदरशांचा सर्वे केला जात आहे. एका व्यक्तीच्या चुकीच्या वर्तवणूकीमुळे मदरशांवर कारवाई केली जात आहे. अशा कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. तसेच जे मदरसे मुस्लिम समाजाकडून पैसे काढून चालवले जात आहे अशा मदरशांवर कारवाई करू नये अशी विनंती या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

Raza Academy Letter To President
Viral: १०० फूट उंच झाडावर दोन बिबट्यांची तुफान झुंज; थरारक दृश्य पाहून सगळेच चक्रावले, पाहा Video

या पत्रात पुढे लिहीण्यात आलंय की, मदरशांबाबत चुकीच्या पद्धतीने प्रचार केला जात आहे. तसेच मदरशांच्या सुरक्षेबाबत या पत्रातून लक्ष वेधून घेतलं जात आहे. विशेष म्हणजे पत्रात काही समाज आणि संघटनांकडून तरुणांना शस्त्र हाताळण्याबाबतही प्रशिक्षण दिले जात असल्याचे सांगत, त्यांचीही चौकशी करा असे म्हणत, अप्रत्यक्षपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) या संघटनेवर पत्रातून टीका करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com