Thane Ghodbunder Road Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Accident : ठाण्यात सकाळी विचित्र अपघात, ५ ते ६ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक; अनेक कारचा चुराडा; पाहा VIDEO

Thane Ghodbunder Road Accident : ठाण्यातील घोडबंदर रोडवर भीषण अपघात झाला आहे. ५ ते ६ गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही मात्र गाड्यांचे नुकसान झाले.

Alisha Khedekar

  • ठाण्यातील गायमुख घाटात ६ वाहनांची समोरासमोर धडक

  • अपघात सकाळी ७ च्या सुमारास घडला

  • जीवितहानी नाही, पण वाहनांचं मोठं नुकसान

  • पोलिसांच्या तातडीच्या हस्तक्षेपाने वाहतूक सुरळीत

ठाण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. शहरातील घोडबंदर रोडवर आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. ⁠पाच ते सहा गाड्यांमध्ये समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र सकाळच्या सुमारास कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसला. अपघातानंतर या रोडवर मोठ्याप्रमाणात गर्दी झाली. पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक कोंडी हटवण्यात आली.

ठाण्यातील घोडबंदर रोड हा वर्दळीचा परिसर आहे. या ठिकाणाहून अनेक मालवाहतूक गाड्या, तसेच मोठमोठ्या गाड्या दररोज ये जा करतात. मात्र आज ⁠सकाळी ७ च्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात पाच ते सहा गाड्यांमध्ये समोरा समोर टक्कर होऊन भीषण अपघात झाला.

सुदैवाने या अपघातात कोणतिही जिवितहानी झाली नसून गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मात्र याचा चांगलाच फटका बसला आहे. सकाळच्या सुमारास झालेल्या या अपघाताने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, पोलिसांनी हस्तक्षेप करून तातडीने वाहतूक कोंडी सोडवळकी असल्याचं वृत्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगर कारने घेतला अचानक पेट

कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

Night Good Habits: रात्री झोपण्यापूर्वी फक्त 5 गोष्टी करा, सकाळी उठल्यावर मूड होईल फ्रेश

मोठी बातमी! मिरा-भाईंदरमध्ये भाजपने बसवला गुजराती महापौर

Truck Accident: भीषण अपघात; शंभरच्या स्पीडनं धावणाऱ्या ट्रकच्या धडकेत २ रिक्षांचा चक्काचूर, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT