Thackeray Group BMC Morcha Teaser saam tv
मुंबई/पुणे

Thackeray Group BMC Morcha Teaser: ठाकरे गटाचा १ जुलैला मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा, पक्षाकडून मोर्चाचा टीझर जारी

BMC Morcha Teaser: बीएमसीच्या मोर्चापूर्वी ठाकरे गटाकडून एक टीझर जारी करण्यात आले आहे. त्यात महापालिकेत कसा भ्रष्टाचार होतोय, यावर ठाकरे गटाकडून बोट ठेवण्यात आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात १ जुलै रोजी ठाकरे गट महानगर पालिकेवर मोर्चा काढणार आहे. “मुंबईकरांच्या पैश्यांची लूट” होत आहे असा आरोप ठाकरे गटाकडून सरकारवर करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी ठाकरे गटाकडून एक टीझर जारी करण्यात आले आहे. त्यात महापालिकेत कसा भ्रष्टाचार होतोय, यावर ठाकरे गटाकडून बोट ठेवण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाकडून राज्य सरकार आणि महानगर पालिकेवर करण्यात आला आहे. ह्या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ ठाकरे गटाने सोशल मीडियावर रिलीज केला आहे. (Latest Political News)

मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा अपेक्षित नाही - आदित्य ठाकरे

आदित ठाकरे म्हणाले, "मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे पाऊस आला त्याचं स्वागत करा, मुंबईत पाणी तुंबलं यांची तक्रार काय करता? घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून इतका बालिशपणा आम्हाला अपेक्षित नाही. मुंबईमध्ये कधी पाणी तुंबत नाही, तिथेही काल पाणी तुंबलं. तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते, काय माहित?" अशी टीकाही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! खात्यात येणार १४ लाख रुपये, वाचा कॅलक्युलेशन

Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! निवृत्तीचे वय आता ६२, महाराष्ट्रासह ७ राज्यांमध्ये नियम बदलणार

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणाच्या साठ्यात ४० टक्क्यांची घट

Cancer symptoms: वीकेंडची मजा ठरू शकते धोकादायक! रिलॅक्स होण्यासाठी केलेल्या ‘या’ सवयी वाढवतायत कॅन्सरचा धोका

Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी'चा विजेता झाला बाबा! जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घरी आली लक्ष्मी, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT