Sanjay Raut Sharad Pawar  Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Sharad Pawar: शरद पवार विरोधकांच्या बैठकीला जाणार का?, संजय राऊतांनी सांगितलं नेमकं कारण...

Opposition Party Meeting: पाटण्यानंतर आता कर्नाटकातील बंगळुरू येथे देशभरातील सर्वच विरोधी पक्षांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Priya More

Sanjay Raut Press Conference: आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरुच आहे. पाटण्यानंतर आता कर्नाटकातील बंगळुरू येथे देशभरातील सर्वच विरोधी पक्षांच्या बैठकीचे (Opposition Meeting) आयोजन करण्यात आले आहे. 22 पेक्षा जास्त पक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवसांच्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार नसल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार (Sharad Pawar) बैठकीला जाणार की नाही याबाबत स्पष्टपणे आपले मत मांडले आहे.

संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मी स्वतः या बैठकीला जाणार आहे. शरद पवार यांच्याविषयी कालपासन संभ्रमाचे वृत्त देण्यात आले की ते या बैठकीला जाणार नाहीत.पण माझा त्यावर अजिबात विश्वास नाही. कारण, या विरोधकांच्या आघाडीचा प्रमुख चेहरा कोणी असेल तर शरद पवार असतील. आज सकाळी फोनवर त्यांच्याशी चर्चा झाली. ते म्हणाले की, आज विशेष कामाचा अजेंडा दिसत नाही. ते उद्या सकाळी साडेदहा वाजता ते बंगळुरूला पोहचत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेते उद्धव ठाकरे आणि शरद पवार बैठकीत सहभागी होणार आहेत.

अब्बास अन्सार यांनी काल एनडीएमध्ये प्रवेश केला. यावरुन देखील संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी सांगितले की,'अब्बास अन्सारी नावाचा महात्मा त्यांनी घेतला. मुख्तार अन्सारी नावाची एक पर्सनालिटी जे सध्या तुरुंगात असून त्यांना आजन्म कारावासची शिक्षा झाली. त्यांचे चिरंजीव अब्बास अन्सारी यांना एनडीएत घेतलं. त्यामुळे त्यांची वॉशिंग मशिन फुटली आहे. त्यांच्यावरही ईडीची कारवाई सुरू होती. काल तुम्ही ज्यांना मातीत मिळवण्याची भाषा करत होतात. आज तुम्ही त्यांना तुमच्या चरणाशी घेत आहात.', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार गटाच्या नवनिर्वाचित मंत्र्यांनी रविवारी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. वेळ न मागता हे सर्व मंत्री अचानक शरद पवार यांना भेटल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. या भेटीवरुन अजित पवार गटावर टीका होत आहे. अशामध्ये संजय राऊत यांनी देखील अजित पवार गटावर निशाणा साधला आहे. 'ते कोणतीही अपॉइंटमेंट न घेता घुसले', या शब्दात त्यांनी टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT