Beed Politics: बीडमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये जुंपली; एकमेकांवर टीकेचा भडीमार करत केले गंभीर आरोप

Beed Marathi News: बीडच्या आष्टी मतदार संघात भाजप-राष्ट्रवादीच्या आमदारात राजकरण तापलं
Beed Politics
Beed PoliticsSaam Tv
Published On

Beed News Today: राज्याच्या राजकारणात सत्तेत एकत्र असले तरी ही बीडच्या आष्टी तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारात चांगलीचं जुंपली आहे. भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यात खुंटेफळ साठवण तलावावरून आरोप प्रत्यारोपाचे राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे बीडमध्ये भाजप राष्ट्रवादीच्या आमदारांचा वाद चव्हाट्यावर आला आहे. (Latest Marathi News)

Beed Politics
Weather Update Today: मुंबईत पहाटेपासूनच पावसाची जोरदार हजेरी; विधानभवन परिसरातील शेड कोसळलं

बीडच्या (Beed) आष्टी तालुक्यातील खुंटेफळ साठवण तलावावरून राष्ट्रवादीचे विधानसभेचे आमदार बाळासाहेब आजबे आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्यात श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपावरून चांगलीच धूस-पुस सुरू झाली आहे.

खुंटेफळ साठवण तलावात नातेवाईकांच्या नावाने जमीन खरेदी करून शासनाला चढ्या दराने विक्री केल्याचा आरोप बाळासाहेब आजबे यांनी केला आहे. विशेष म्हणजे सुरेश धस यांच्या मामाच्या मुलाच्या नावाने साठवण तलावाच्या क्षेत्रातील जमीन खरेदी केल्याचा आरोप देखील बाळासाहेब आजबे यांनी केला आहे.

तर यावर सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आव्हान देत जर आमच्या नातेवाइकांच्या नावावर एक गुंठाही जमीन असेल तर आमच्या कुटुंबातील एकही व्यक्ती विधानसभा लढवणार नाही, असे आव्हान भाजपचे आ. सुरेश धस यांनी दिले.

मात्र यावर बाळासाहेब आजबे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व पुरावे मांडले. खुंटेफळ साठवण तलावात महेश शिंदे, गणेश शिंदे , नवनाथ शिंदे आणि मोहन हौसराव झांबरे यांच्या नावावर जमीन आहे, हे कुणाचे नातेवाईक आहेत. हे मलाच नाही तर पूर्ण तालुक्याला माहीत आहे. सुरेश धस यांनी मला जास्त तोंड उघडायला लावू नये असे देखील आजबे म्हणाले.

Beed Politics
Vande Bharat Express Fire: धावत्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला अचानक आग; थरकाप उडवणारा VIDEO समोर

या पत्रकार परिषदेला उत्तर देत सुरेश धस यांनी हल्ला चडवला. साठवण तलाव होऊ न देण्यासाठी बाळासाहेब आजबे कट कारस्थान करत असल्याचा आरोप केला. स्थानिक मतदार संघातील निवडणुका भाजप- शिंदे गट स्वतंत्रपणे लढणार आहोत, असे सांगून कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कोणत्याही गटाशी आम्ही युती करणार नाही, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

दरम्यान साठवण तलावावरून या दोन आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांच्या आरोपांचे खंडन केले. दरम्यान, राज्यात जरी भाजप-राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र आली असली तरी आष्टीत मात्र विरोध कायम असल्याचे दिसत आहे. म्हणजे दोन्ही आमदार 2024 निवडणुकींसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे आहेत. त्यामुळं खुंटेफळ साठवण तलावाच्या कामावरून सध्या आष्टीत राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com