cm Eknath shinde, deputy cm devendra fadnavis, saam tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial On Shinde Government: 'नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण...; दैनिक 'सामना'तून जोरदार हल्लाबोल

दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे

Vishal Gangurde

Mumbai News: सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सत्ता संघर्षावर निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर राजकीय नेत्यांकडून सोयीचा अर्थ काढला जात आहे. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

'राज्यकर्त्यांनी नैतिकता ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवली आहे. तर लाज नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचत आहे, अशी टीका दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अग्रलेखातील मुद्दे जसेच्या तसे

' राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री विजयी हास्याने पत्रकारांसमोर आले व म्हणाले, ‘‘आम्हीच जिंकलो आहोत. निकाल आमच्या बाजूनेच लागला. लोकशाहीचा विजय झाला,’’ असे हसत हसत सांगणे याला मराठीत कोडगेपणा म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने या मंडळींना इतके उघडे-नागडे केले आहे की, त्यांच्या कमरेवर अंतर्वस्त्रही ठेवले नाही, अशी टीका ठाकरे गटाने दैनिक 'सामना'तील अग्रलेखातून केली आहे.

' नैतिकता तर त्यांनी ठाण्याच्या मासुंदा तलावात बुडवलीच, पण उरलीसुरली लाजही नागपूरच्या अंबाझरी तलावाकाठी उघडी होऊन नाचताना दिसत आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांचे सरकार स्थापन करताना सर्वकाही चुकीचे केले, घटनाबाहय़ केले, असे सर्वोच्च न्यायालयाने फटकारूनही या मंडळींना असा कोणता विकृत आनंद झाला? सर्व बेकायदेशीर असूनही सरकार वाचले याचा? की न्यायालयाने त्यांच्या निर्लज्जपणावर शिक्कामोर्तब केले याचा? असा सवाल करत दैनिक 'सामना'तून करण्यात आला आहे.

'आमदारांना अपात्र ठरविण्याचा अधिकार न्याय मंडळास नाही, पण आमदारांनी बेकायदेशीर कृत्य केलेच आहे. बनावट व्हीप निर्माण केला. शिंदे गटाचा व्हीपच न्यायालयाने खोटा ठरविला. त्या खोटय़ा ‘व्हीप’चे आदेश पाळून आमदारांनी पक्षद्रोह केला हे न्यायालयाने सिद्ध केले, असेही दैनिक 'सामना'च्या अग्रलेखात म्हटले आहे.

'सर्वोच्च न्यायालयाने तेच केले आहे, पण महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोठे आहेत? ते पडद्यामागे कोणत्या हालचाली करीत आहेत? न्यायालयाने गुन्हेगार ठरवलेल्या आमदारांवर ते कायद्याने कारवाई करणार की घटनापीठावर बसलेली ही व्यक्ती पुन्हा राजकीय स्वार्थासाठी दोषी आमदारांचा बचाव करणार? असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला.

'राष्ट्रपतींनी निवडणूक आयोगाला घरी पाठवायला हवे, पण येथे घटनेची चिंता आहे कोणाला? हमाम मे सब नंगे! तेव्हा प्रत्येकजण नंगा होऊन आनंदोत्सव साजरा करतोय. उघडे होऊन नाचत आहे. महाराष्ट्र हे सगळे पाहत आहे. जग त्यांच्यावर हसत आहे. श्रद्धा आणि सबुरी ठेवूया. सर्वोच्च न्यायालयाने उघडे पाडलेले कायमचे घरी जातील. लवकरच, अशीही टीका ठाकरे गटाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जुनी विधानसभा आज बरखास्त होणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; या पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

बदाम-पिस्ता नाही तर तुपात भाजलेला 'हा' पदार्थ कोलेस्ट्रॉल करेल कमी, आजच वापरा

Mrunal Thakur : 'तू मराठी आहेस का?' चाहत्याच्या प्रश्नावर मृणालचं खास उत्तर, गायले 'हे' गाणं

Laziest Zodiac Sign: या राशींच्या व्यक्ती असतात अळशी; कोणत्याही कामाला देतात नकार

SCROLL FOR NEXT