THACKERAY BROTHERS MARCH ROUTE CHANGED saam tv
मुंबई/पुणे

राज-उद्धव ठाकरेंच्या मोर्चाचा मार्ग बदलला; आता कुठून निघणार, कुठे धडकणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray October 4 Joint March Route Changed: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या संयुक्त महामोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. भायखळ्याऐवजी आता मेट्रो सिनेमा जंक्शनपासून मोर्चाला सुरुवात होणार असून मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा जाणार आहे.

Omkar Sonawane

वैदेही काणेकर, साम टीव्ही

मुंबई: केंद्रीय निवडणुक आयोगाचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर ज्ञानेश कुमारांविरोधात वातावरण तापलं आहे. तसेच त्यांच्या विरोधात ठाकरे बंधूंनी देखील एल्गार पुकारला आहे. 4 ऑक्टोबर रोजी, रविवारी मुंबईत मनसे आणि ठाकरेसेनेचा संयुक्त महामोर्चा निघणार आहे. पण त्याआधीच महत्वाची अपडेट समोर आली आहे. या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. या मोर्चाची जोरदार तयारी सुरू असतानच या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

याआधी हा मोर्चा भायखळा ते आझाद मैदान असा जाणार होता. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असून राज्यभरातून शिवसैनिक आणि मनसैनिक येण्याची शक्यता आहे. या मोर्चासाठी जय्यत तयारी सुरू असतानाच आता मोर्चाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे बंधूंचा हा मोर्चा मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा जाणार आहे. मोर्चाचे अंतर थोडे कमी झाल्याचे दिसून येत आहे. रविवारी सकाळी 10 वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे.

रविवारी 4 ऑक्टोबर रोजी मेट्रो सिनेमापासून हा मोर्चा निघेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चाला सकाळी 11 वाजता सुरुवात होण्याची शक्यता आहे. दहा वाजता या मोर्चाला जमा होण्यास सुरुवात होईल. हा मोर्चा पुढे जात महापालिकेसमोर येईल. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर होणार असून मोठा स्टेज उभारला जणार आहे. या मोर्चामध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी होणार असून ठाकरे बंधू काय भाष्य करता याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दिवेआगर समुद्र दुर्घटना अत्यंत दुर्दैवी; समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची गरज

Best Foods For Kidney: दररोजच्या आहारात 9 गोष्टींचा करा समावेश, तुमची किडनी कधीच खराब होणार नाही!

Yuzvendra Chahal Retirement : भारतीय क्रिकेटपटूचा मोठा निर्णय! फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रदीप पूर्णेकर हत्येपूर्वीच्या दोन दिवसांत काय घडलं? राम पूर्णेकरांच्या जबाबातून महत्त्वाचा खुलासा

Dark Chocolate vs Regular Chocolate: डार्क चॉकलेट की चॉकलेट्स आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर? वाचा...

SCROLL FOR NEXT