बोगस शिक्षक सावधान ! नियुक्त शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची होणार पडताळणी Saam TV
मुंबई/पुणे

बोगस शिक्षक सावधान ! नियुक्त शिक्षकांच्या ‘टीईटी’ प्रमाणपत्राची होणार पडताळणी

या प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षा आणि त्यातील गैरव्यवहाराची बरीच माहिती समोर आली आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : राज्यात फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या शिक्षक पात्रता परीक्षा प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. या पडताळणीतून बोगस प्रमाणपत्राच्या साहाय्याने नोकरी मिळविलेल्या शिक्षकांचा शोध लागणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पुढाकार घेतला असून संबंधित शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे मागवण्यात आली आहेत. ‘टीईटी’ परीक्षेच्या (TET Exam) निकालात फेरफार करून अपात्र उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले आहे. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे (Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह काही जणांना पुणे पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना टीईटी परीक्षा आणि त्यातील गैरव्यवहाराची बरीच माहिती समोर आली आहे. त्याची दखल घेत परीक्षा परिषदेने पहिल्या टीईटी परीक्षेच्या निकालानंतर म्हणजेच फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांची टीईटी प्रमाणपत्रे पडताळणीचा निर्णय घेतला. त्यातून टीईटी परीक्षेत सुरवातीपासून काही गैरव्यवहार झाला आहे का?, उमेदवारांना बोगस प्रमाणपत्रे दिली आहेत का? याची पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी ‘टीईटी’ची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी तातडीने सादर करावीत, असे आदेश राज्य परीक्षा परिषदेने यापूर्वीच दिले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; महिला नेत्याकडून राजीनामा, राष्ट्रवादी अजित पवारांची देणार साथ

Julali Gaath Ga: सावी घरच्यांचा विरोध पत्करून करणार धैर्यसोबत लग्न; 'जुळली गाठ गं' मालिकेत अखेर सावी-धैर्यची जुळली सात जन्माची गाठ

Jai Vilas Palace History: ग्वाल्हेरच्या जय विलास पॅलेस भव्य राजवाड्याचा इतिहास जाणून घ्या

Post-meal sugar cravings: जेवणानंतर गोड खात असाल तर 'या' समस्या लागतील मागे

Madhura Joshi: हिरवी साडी, गळ्यात हार; 'ठिपक्याची रांगोळी' फेम मधुरा जोशीचं पारंपारिक सौंदर्य

SCROLL FOR NEXT