मुंबईत मुसळधार पावसामुळे मोनो रेल पुन्हा एकदा बंद पडली.
वडाळा परिसरात मोनो रेल बंद पडल्याने प्रवाशांना अडकून राहावे लागले.
मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून वाहतूक विस्कळीत झाली.
मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे उशिराने धावत आहेत; बससेवाही उशिरा.
प्रवाशांना सकाळच्या गर्दीच्या वेळी मोठा त्रास सहन करावा लागला.
wadala chembur monorail halted passengers stranded in rainfall : मुंबईमध्ये पुन्हा एकदा मोनो रेल बंद पडली आहे. तांत्रिक कारणामुळे मुंबईमध्ये मोनो रेल बंद पडली आहे. पहाटेपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. ऑफिसमध्ये जाण्यासाठी मुंबईकरांची लगबग सुरू आहे. त्यातच मोनो रेल बंद पडल्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागला. वडाळाजवळ मोनो रेल बंद पडली. त्यामुळे काही प्रवासी अडकले होते. प्रशासनाने प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra: A monorail comes to a halt in the Wadala area of Mumbai due to technical glitches)
मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पावसाचा परिणाम मुंबईमधील वाहतूक सेवेवरही झाला आहे. रस्त्यावर पाणी असल्याने बस उशिरा धावत आहेत. त्यात पावसामुळे लोकलही उशिरा धावत आहे. मध्य रेल्वेची लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. तर हार्बर मार्गावरील लोकल पाच ते १० मिनिटे उशिरा धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेही उशिरा धावत आहे.
मुंबईतील वडाळा परिसरात आज सकाळी मोनोरेल सेवेला तांत्रिक बिघाडामुळे खीळ बसली. या घटनेमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास वडाळा ते चेंबूर मार्गावरील मोनोरेल अचानक थांबली. तांत्रिक कारणांमुळे ही सेवा काही काळासाठी पूर्णपणे बंद राहिली, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली. मुंबई मोनोरेल प्रशासनाने तातडीने प्रवाशांना बाहेर काढले.
मुंबई मोनोरेल ही शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि जलद प्रवासाचा पर्याय देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. मात्र, अशा तांत्रिक बिघाडांमुळे या सेवेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काही दिवसापूर्वीही मोनो रेल बंद पडली होती. त्यावेळी काचा फोडून आतमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात आले होते. मोनो रेल प्रशासनाकडून बिघाडाचे नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. प्रत्यक्षात, हा बिघाड विद्युत पुरवठा किंवा यांत्रिक समस्येशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे मोनोरेलवर अवलंबून असलेल्या प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.