Ajit Pawar Satyajit Tambe Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Ajit Pawar : नाशिकमधून सत्यजित तांबेच विजयी होतील, आणि ते.., अजित पवारांचं मोठं विधान

नाशिकमधून सत्यजीत तांबेच निवडून येणार आहेत, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Ajit Pawar News : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून आतापर्यंत दोन जागांचे निकाल हाती आले आहेत. एकीकडे कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरात भाजपचा पराभव झाला आहे. (Ajit Pawar Latest News)

अजूनही औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ, अमरावती पदवीधर, नाशिक पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या ठिकाणी भाजप पिछाडीवर आहे. नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे पहिल्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. नागपुरात महाविकासआघाडीचा विजय झाल्यानंतर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आजचा निकाल म्हणजे सत्ताधारी पक्षाला चपराक आहे, असा टोला अजित पवारांनी भाजपला लगावला.  (Latest Marathi News)

त्याचबरोबर पदवीधर आणि शिक्षक हा दोन्ही वर्ग आमच्या पाठीशी असून नागपूर सारखी जागा देखील अडचणीत आलेली आहे. कोकणचे उमेदवार जरी जिंकले असतील तरी ते शिवसेनेचेच होते, ते उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहेत. असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Political News)

'नाशिकमधून सत्यजित तांबेंचाच विजय होणार'

नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीत सत्यजित तांबेंनी आघाडी घेतली असून महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील या पिछाडीवर आहेत. दरम्यान, या निकालाबाबतही अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

नाशिकमधून सत्यजीत तांबेच निवडून येणार आहेत, असा विश्वास विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. सत्यजित तांबे हे काँग्रेस पक्षाचे युवकांचे अध्यक्ष होते. ते पक्षाचे जवळचे कार्यकर्ते होते. त्यांना उमेदवारी दिली असती तर असं घडलं नसतं, असं म्हणत अजित पवार यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या.

सत्यजित तांबेच (Satyajit Tambe) निवडून येतील आणि योग्य तो निर्णय घेतील, असं देखील अजित पवार म्हणाले. सत्यजित तांबे हे तर पूर्ण काँग्रेसचे त्यांच्या रक्ता रक्तात काँग्रेस (Congress) आहे, त्यामुळे ते भाजपमध्ये जाणार नाही, असा विश्वास देखील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर आजच्या विजयाने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हूरळून जावू नये अजून मोठी लढाई बाकी आहे, असं देखील ते म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : पुष्पा म्हणतो झूकेगा नाही साला, गद्दार म्हणतो उठेगा नाही साला - ठाकरेंचा शिंदेंना टोला

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT