रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिक्षिका पहिल्याच दिवशी 'अनुपस्थित' अजय दुधाणे
मुंबई/पुणे

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिक्षिका पहिल्याच दिवशी 'अनुपस्थित'

खड्ड्यांमुळे शिक्षिकेचा अपघात झाल्याने पायाला दुखापत

अजय दुधाणे

अंबरनाथ - रस्त्यावरील खड्ड्यांमुळे शिक्षिकेचा अपघात होऊन शिक्षिका शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत Schoolउपस्थित राहू शकली नसल्याची घटना अंबरनाथमध्ये Ambernath घडली आहे. त्यामुळे आता तरी सरकारने खड्डे बुजवावेत, अशी मागणी या शिक्षिकेने सरकारकडे केली आहे. ललिता मोरे असे या अपघातात Accident जखमी झालेल्या शिक्षिकेचे नाव असून त्या अंबरनाथच्या चिखलोली परिसरात वास्तव्याला आहेत. कल्याणच्या Kalyan एका खासगी शाळेत ललिता या शिक्षिका म्हणून काम करतात.

हे देखील पहा -

शनिवारी ललिता या अंबरनाथहून कल्याणला जात असताना उल्हासनगर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली असून त्यामुळे त्यांना सध्या वॉकरचा आधार घेऊन चालावं लागत आहे.

अशा परिस्थितीत आजपासून शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत उपस्थित राहणं त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे ललिता यांना याची मोठी खंत वाटतेय. त्यातच ललिता यांची बहिण असलेल्या कविता महाले या देखील मुंबई महापालिकेच्या शाळेत शिक्षिका असून ललिता यांचा अपघात झाल्यामुळे सध्या ललिता यांची काळजी घेण्यासाठी त्या त्यांच्या घरी आल्या आहेत.

त्यामुळे त्यांना देखील आज शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेत जाता आलं नाही. त्यामुळे या दोन्ही शिक्षिकांना आज शाळेच्या पहिल्याच दिवशी खड्ड्यांमुळे अनुपस्थित राहण्याची वेळ आली. याबाबत या दोघींनी सुद्धा मोठी खंत व्यक्त केली आहे. तसेच सरकारने रस्त्यांवर पडलेले खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी या दोघींनी सुद्धा केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Arjun: धुरंधर फेम २० वर्षीय सारा अर्जुनची एकूण संपत्ती किती कोटी आहे?

IPL 2026: IPL सुरू होण्याआधी दारू सोडली, दिग्गज खेळाडूनं एबीसमोर सांगितलं कारण

Pani Puri Pani Recipe: स्ट्रीट स्टाईल चटपटीत पाणीपुरीचे पाणी घरी कसं बनवाल? 'ही' आहे सीक्रेट रेसिपी, खाणारे खातच राहतील

LPG गॅसचं पहिलं एटीएम आलं, आता मिनिटात फुल करा सिलिंडर, वाचा

Maharashtra Live News Update: पुण्यात गुढी पाडव्यानिमित्ताने 12 हजार वाहनांची खरेदी

SCROLL FOR NEXT