सोमाटने टोल नाक्याविरोधात तळेगावकारांचे 
जनआक्रोश आंदोलन
सोमाटने टोल नाक्याविरोधात तळेगावकारांचे जनआक्रोश आंदोलन  SaamTvNews
मुंबई/पुणे

सोमाटने टोल नाक्याविरोधात तळेगावकारांचे जनआक्रोश आंदोलन

दिलीप कांबळे

मावळ : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटने टोल (Somatane toll plaza) नाक्यावर बेकायदेशीर टोल वसुली सुरू होती. त्या विरोधात तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील सर्व पक्षीय कृती समितीने 'टोल हटाव'चे शस्त्र उगारलं आहे. त्या निषेधार्थ आज जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर (Mumbai Pune Highway) जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चासाठी सर्व सामान्य तळेगावकर नागरिकांसह सर्व पक्षीय नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

हे देखील पहा :

मात्र, या मोर्चात (morcha) कुठेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी हा मोर्चा टोल नाक्याच्या आधीच अडवला. त्यामुळे काही वेळ आंदोलक आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाली. सोमाटने टोल नाक्याबाबत दहा मे पर्यंत निर्णय घेतला नाही तर पुढील मोर्चाचं चित्र अधिकच आक्रमक वेगळं असेल असा इशारा सर्व पक्षीय कृती समितीने यावेळी दिलाय.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पुण्यात अग्नितांडव! काल रात्री ३ ठिकाणी लागली आग

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

Maharashtra Weather Forecast: पुणे, ठाणे आणि रायगडसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळीची शक्यता

SCROLL FOR NEXT