Pune News  Saam TV
मुंबई/पुणे

Swayam Talks Pune 2023 : आयुष्याला दिशादर्शक ठरणारा 'स्वयं टॉक्स' आता पुण्यात

Swayam Talks : डॉ. उदय निरगुडकर या सर्व मान्यवरांशी संवाद साधणार आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Pune News :

आपल्या कामातून समाजात आदर्श निर्माण करणारे अनेक लोक आपल्या आजूबाजूला आहेत. या असामान्य व्यक्तीमत्वांचा प्रेरणादायी प्रवास सर्वांसमोर यावा, यासाठी हक्काचं व्यासपीठ सकाळ समुहाने 'स्वयं टॉक्स'च्या माध्यमातून उपलब्ध करुन दिलं आहे.

'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने 'स्वयं टॉक्स' पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तमत्वांना आपला प्रवास लोकांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.

'स्वयं टॉक्स'मध्ये भारतीय आणि जर्मन कंपन्यांमध्ये येणारे 'सांस्कृतिक अडथळे' दूर करणाऱ्या वैशाली करमरकर, मानवी वस्तीतील बिबट्याच्या अस्तित्वावर आधारित ८ शोधनिबंध प्रकाशित असलेले आणि वाईल्डलाईफ व प्रवासाची पॅशन जपणारे स्वप्निल कुंभोजकर, मराठावाड्याचे पहिले 'आयर्नमॅन' ठरलेले नितीन घोरपडे आपला जीवनप्रवास उलडणार आहेत.

डॉ. उदय निरगुडकर या सर्व मान्यवरांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे प्रमुख उपस्थिती लावणार आहेत.

येत्या ८ ऑक्टोबर रोजी पुण्यातील शकुंतला जगन्नाथ शेट्टी ऑडिटोरीयम, डॉ. कलमाडी शामराव हायस्कूल, पांडुरग कॉलनी, एरंडवणे येथे 'स्वयं टॉक्स'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

स्वयं टॉकच्या लाईव्ह कार्यक्रमाला कला-साहित्य क्षेत्रातील मान्यवरांसह विद्यार्थ्यांपासून दिग्गज व्यक्तिमत्वांपर्यंत सर्वच क्षेत्रातील लोक हजेरी लावणार आहेत. २०१४ मध्ये सुरू झालेला 'स्वयं टॉक्स'चा प्रवास आज महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. समाजाला प्रेरमादायी ठरेल अशा अनेकांचा प्रवास आज या माध्यमातून समाजासमोर मांडला जात आहे.

स्वयं टॉक्सच्या या कार्यक्रमाची तिकीट विक्री सुरू झाली आहे. मोजकेच तिकीट उपलब्ध आहेत. तुम्हाला तिकीट बूक करायचे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून बुक करु शकता.

बुकिंगसाठी येथे क्लिक करा : https://swayamtalks.org/swayamevent/swayam-pune-2023/

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

Beed Politics: बीडमध्ये मोठी राजकीय घडामोड, शिंदेसेनेला दिलेला पाठिंबा MIM ने मागे घेतला

Ladki Bahin Yojana: eKYC केली, आता लाडक्या बहिणींना जानेवारीचे ₹१५०० कधी मिळणार? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : अक्कलकुवा तालुक्यातील दुधलीबादल पाड्यात तीन घरे जळून खाक

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

SCROLL FOR NEXT